दिनांक 17 शहादा तालुक्यातील डोंगरगाव शिवारात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदार विरुद्ध आदिवासी वाल्मीकलव्य सेनेकडून तहसीलदार शहादा यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथे मोठा गौण खनिज साठा असल्याकारणाने तालुक्यातील नवीन रस्त्यांचे काम घेतलेल्या ठेकेदारांनी त्यांचे तळ इथे उभारले आहेत. रस्ता निर्मितीसाठी लागणाऱ्या गौण खनिजाच्या उत्खनन येथे रात्रंदिवस चालू असते त्यामुळे शेजारील गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे उत्खननाचे काम रात्रंदिवस चालू असल्याने मशीनच्या कर्कश आवाज व वाहतुकीसाठी वापरली जाणारी अवजड वाहनांमुळे नागरिकांना, लहान बालकांना रात्रभर झोप लागत नाही व जमिनीत कंपने निर्माण होत असल्याकारणाने भूकंप सदृश्य परिस्थिती जाणवते त्यामुळे बालके घाबरतात व झोपेतून बडबड करतात. मागील कित्येक महिन्यांपासून हे उत्खनन चालू असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यापूर्वी तोंडी माहिती देऊन सुद्धा त्यावर कोणतीही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याने आता लेखी स्वरुपात आदिवासी वाल्मीकलव्य सेने चे नंदुरबार जिल्हा उपअध्यक्ष कृष्णा कोळी यांनी तहसीलदार शहादा यांना निवेदन दिले आहे.
Tags
news
