शहरात लावलेले बँनर फाडले, अमळनेरात न.पा.अधिकारी वर गुन्हा, जैन धर्माच्या भावना दुखवल्याचा आरोप



 

अमळनेर - नगरपालीकेचे उपमुख्य अधिकारी यांनी शहरात जैन धर्मीयांचे गूरू व संसारूपी मोहमाया त्याग करणाऱ्या १६ वर्षीय विनय बागरेचा या नव्यानेच दिक्षा घेणाऱ्या यूवकाचे सर्वत्र स्वागत होत असतांना पालीकेने शहरात लागलेले त्यांचे बँनर फाडून विद्रूपीकरण केले आहे.यामूळे जैन धर्मीयांच्या भावना दूखावल्याची प्रतिक्रिया सर्वत्र ऊमटत आहे. अनधिकृत फलक काढण्याला आमचा विरोध नाही मात्र फक्त गेल्या १० दिवसात  लागलेले शहरातील बँनरमूळे शहर विदृप होत नव्हते आणि आजच पालीकेला कोणती ऊपरती आली शांत सोज्वळ समजल्या जाणाऱ्या जैन समाजाचेच बँनर काढून टाकले. पालीका प्रशासनाने ईतर गैरकृत्यांसह ईतर लागलेले बँनर काढून खरी मर्दानागीकी दाखवावी.या प्रकरणी संपूर्ण तालूक्यासह राज्यातील जैन धर्मियां व विविध जैन संघटनांन कडून पालीका प्रशासनाचा निषेध करण्यात येत आहे. रात्रीच्या सुमारास भाडोत्री कामगार आणून बॅनर काढून उपमूख्याधिकारी गायकवाड यांनी शांत असलेल्या शहराला गालबोट लावण्याचा व जैन समाजाच्या भावनांना ठेच पोहचवली आहे. अमळनेर येथील संजय तिलोकचंद जैन यांनी अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये सहाय्यक मुख्याधिकारी गुन्हा दाखल केला असुन जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दीले असुन सर्व जैन समुदायाचे या कडे लक्ष लागले आहे.तरी संबंधीत उपमुख्य अधिकारी यांचेवर कठोर कार्यवाही व्हावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने