दोंडाईचा - प्रहार जनशक्ती पक्षाकडून शिंदखेडा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पाटील साहेब यांना निवेदन देण्यात आले की दोंडाईचा शहरातील अहिंसा इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हे मनमानी करून पालकांकडून शंभर टक्के फी वसुली करत असून ज्या पालकांनी आपल्या पाल्यांचे 100% फी भरली नसून अशा पाल्यांना व विद्यार्थ्यांना ऑनलाइन लेक्चर व ग्रुप मधून काढून शिक्षणापासून वंचित ठेवले जाते तसेच वर्गात बसू दिले जात नाही. मा.बच्चुभाऊ कडू( शिक्षण,जल संपदा,कामगार मंत्री) महाराष्ट्र राज्य मंत्री यांच्या वक्तव्यावरून covid-19 या महामारी आजाराकडे पाहता सगळे शाळा यांना 50 टक्के फी घ्यावे असे सांगून व नुकतेच हायकोर्टाचे आदेश आले असून की फी साठी कुठल्याही विद्यार्थ्यांना डावलू नये असे कोर्टाचे व माननीय बच्चुभाऊ चे आदेश असून त्याचे अवमान दोंडाईचातील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल करताना दिसत आहे .तसेच ऑनलाइन चेक भरण्यास शाळे कडून विरोध केला जातो आणि ती भरण्यासाठी मुदत संपल्यानंतर दंड म्हणून जासतीचे पैसे आकारले जात आहेत तसेच पालकांनी आपल्या पाल्याचे फी भरून सुद्धा पावती देण्यात आली नाही संपूर्ण फी(100%) भरल्यानंतर पावती देण्यात येते शाळेकडून असं सांगण्यात आले मागणी (पालकांकडून फक्त 50 टक्के फी घ्यावे) म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष तर्फे येत्या आठ दिवसात ठिय्या आंदोलन शिक्षण अधिकारी धुळे यांच्या कार्यालय समोर करण्यात येईल असा इशारा देण्यात आला .त्यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष पदाधिकारी तालुका अध्यक्ष माननीय पंकज भाऊ सिसोदिया उपाध्यक्ष सोनू भाऊ राजपूत तालुका सहसचिव हितेश भाऊ पाटील शिंदखेडा शहर अध्यक्ष अमोल भाऊ शिंपी दोंडाईचा शहराध्यक्ष विकास ठाकूर, पंकज चौधरी व ग्रामीणचे किशोर भाऊ,रविभाऊ चित्ते,सीमाताई बागले,अशोक भावसार,पुष्पाताई, कैलास तिरमली व पालक रुंद पैकी जयकुमार भाऊ,चेनानी जितेंद्र भाऊ, विनोद भाऊ इत्यादी व इतर प्रहार सदस्य उपस्थित होते.
Tags
news
