शिरपूर : महावितरणच्या विद्युत ग्राहकांनी विद्युत बिलाचा भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करून जनतेच्या घरात अंधार पसरवू पहाणाऱ्या महाविकास आघाडीचे ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांच्या विरोधात (दि.५ फेब्रुवारी) रोजी शिरपूर भाजपातर्फे महावितरणच्या कार्यालयसमोर आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलन करत निर्दशने करण्यात आलीत. महावितरण कंपनीने लॉकडाऊनच्या काळात अंदाजे ग्राहकांना अवास्तव विज बिल दिले त्यानंतर वीज बिल माफी देऊ, वीजबिल सूट देऊ पासून १०० युनिट पर्यंत मोफत वीज देऊ अश्या सवंग व खोट्या घोषणा केल्या. त्यामुळे ग्राहक सवलत मिळण्यासाठी वाट पाहू लागले महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जनतेत रोष असल्याने शिरपूर भारतीय जनता पार्टी तर्फे येथील महावितरण कार्यालयसमोर हल्लाबोल आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. ऊर्जा खात्याचे मंत्री ना. नितीन राऊत यांनी वीज बिल माफ करणे, १०० युनिट विद्युत मोफत देणे ही माझी जबाबदारी नाही ती जबाबदारी मंत्रीमंडळाची आहे. मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेऊ शकतात अशी फेकाफेकी केली. महाविकास आघाडीच्या खिचडी सरकारमधील गोंधळलेल्या मंत्र्यांमुळे विद्युत ग्राहकांना व जनतेला नाहक मनस्ताप होत आहे. म्हणुन भाजपा कार्यकर्त्यांनी व पिडित विद्युत ग्राहकांनी शिरपूर येथील महावितरणच्या कार्यलयासमोर हल्लाबोल आंदोलन करत निर्दशने केलीत यावेळी. भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, तालुका सरचिटणीस मंगेश भदाणे, जितेंद्र सुर्यवंशी, तालुका चिटणीस सुनिल चौधरी, तालुका प्रसिध्दी प्रमुख निलेश देशमुख, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, मुकेश पाटील, प्रशांत राजपूत, भटू आप्पा माळी, चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, राजुलाल मारवाडी, मुबीन शेख, विक्की चौधरी, रफीक तेली, जितेंद्र पाटील, भटू माळी, जितेंद्र माळी, राज सिसोदिया, विजय सुर्यवंशी, वसंत सुर्यवंशी, राजेंद्र पाटील, भुपेश परदेशी, ओमप्रकाश दायमा, विजय सावळे, अतुल माळी, पप्पु माळी, धनराज गुरव, गोपाल माळी, रविंद्र राजपूत, रुषीकेश माळी, बशीर रंगरेज आदि पदाधिकारी, बुथ प्रमुख, कार्यकर्त्यांनी व विघुत ग्राहक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Tags
news
