केंद्र सरकारच्या निषेधार्थ पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात शिरपूर-तालुका शिवसेनेचा सायकल ढकल मोर्चा




शिरपूर :-५ फेब्रुवारी २०२१ रोजी  केंद्र सरकारच्या निषेधार्थ पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात  शिरपूर-तालुका  शिवसेनेचा  सायकल ढकल मोर्चा काढण्यात आला होता.
   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख  मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते मा.श्री.संजयजी राऊत साहेब, उत्तर महाराष्ट्र समन्वयक आदरणीय मा.श्री.रविंद्रजी मिर्लेकर  ,धुळे - नंदूरबार, मा.श्री.बबनराव थोरात यांच्या सूचनेनुसार तसेच सहसंपर्क प्रमुख इंजि..अतुलभाऊ सोनवणे, धुळे जिल्हाप्रमुख (ग्रामीण)-.इंजि.हेमंत साळुंखे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात आंदोलन  करण्यात आले.दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेल व गॅसचे भाव गगनाला भिडत चालले असून यामुळे महागाईचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पेट्रोल 94 रु. तर डिझेल 83 रु. पर्यंत गेले असून घरगुती गॅस आज 25 रु. वाढून 734 रुपयां पर्यंत गेला तर  यासोबत व्यावसायिक सिलेंडर चे भाव नोव्हेंबर मध्ये 1200 रु. होते ते आज फेब्रुवारी मध्ये 1550 रु. म्हणजे तब्बल 350 रुपयांनी महागले. मोदी सरकार अच्छे दिनाचे गाजर दाखवून, जनतेची दिशाभूल करून , खोट बोलून सत्तेत आले, आणि हेच का अच्छे दिन ? हा देखील सामान्य जनतेतुन प्रश्न विचारला जातो आहे. जन सामान्यां मध्ये चीड निर्माण झाली असून पेट्रोल-डिझेल व गॅसचे भाव ताबडतोब कमी करावे यासाठी केंद्र सरकार विरोधात शिरपूर तालुका शिवसेनेचा सायकल ढकलत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून झोपलेले मोदी-शाहा  सरकार जागे होतील.उपस्थित शिवसेना पदाधिकारी शिरपूर तालुक्यातील उपजिल्हा प्रमुख श्री.भरतसिंग राजपूत,उपजिल्हा संघटक-श्री.विभा जोगराणा ,एसटी कामगार सेनाचे जिल्हा अध्यक्ष श्री.राजू टेलर ,तालुका प्रमुख इंजि.अत्तरसिंग पावरा,तालुका प्रमुख -श्री.दिपक चोरमले ,तालुका संघटक श्री.योगेश सुर्यवंशी, उपतालुका प्रमुख-श्री.मंगलसिंग भोई ,युवा सेना प्रमुख -श्री.विजय पावरा,युवा सेना शहर समन्वय- सचिन शिरसाठ महाराष्ट्र वाहतूक सेना तालुका अध्यक्ष-श्री.नंना जाधव,महिला आघाडी श्रीमती.वीणा वैध,श्रीमती.अर्चना देसले,तसेच शिवसैनिक निरंजन पाटील,दिपक राजपूत,सुनिल सूर्यवंशी,तुषार महाले,सुनिल मालचे,सुनिल पाडवी, देवींद्र पाटील,पिंटू शिंदे,किरण मोरे,सयाजी भिल,दिनेश गुरव,अमोल ठेलारी,राहुल पावरा,होल्या पावरा, मंगल पावरा, दिलीप पावरा, दारासिंग पावरा आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने