शिरपूर प्रतिनिधी- अखिल भारतीय किसान सभा तालुका शिरपूर तर्फे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे .यात तसे नमूद करण्यात आले आहे की अखिल भारतीय किसान सभा तर्फे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे, सरकारने चार ही आंदोलन स्थळावर प्रचंड पोलिस बळ लावले आहे, आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, इंटरनेट, अन्नपदार्थ यांचा पुरवठा बळाचा वापर करून तोडण्यात आला आहे. सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय असून संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान सभा सरकारच्या दडपशाहीच्या तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. आणि म्हणून दिनांक 6 फेब्रुवारी रोजी त्याचाच एक भाग म्हणून दिल्लीच्या शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशव्यापी आंदोलन करण्याचे आवाहन किसान सभेने केले आहे. त्यानुसार धुळे जिल्हा विधानसभा तर्फे दिनांक 6 फेब्रुवारी रोजी हिंसाळे बस स्टँड शेजारी शिरपूर चोपडा रोड वर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरीविरोधी तीन ही कायदे रद्द करा शेतकऱ्यांना किमान आधार भावाच्या कायदा मंजूर करा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करा यासह स्थानिक समस्या याबाबत मागण्या निवेदनात नमूद केले आहे. याबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकातून भाकपचे तालुका सेक्रेटरी एडवोकेट संतोष पाटील व धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष एडवोकेट हिरालाल परदेशी यांनी दिली आहे.
Tags
news
