शिरपूर पंचायत समिती मधील शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचे निलंबन कामात अनियमितता केल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी केली कारवाई




 शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर पंचायत समितीमध्ये शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की शिरपूर तालुक्यातील गिधाडे गावात दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत भूमिगत गटार यांच्या कामात स्वतःची स्वाक्षरी करून खोटे बिल पास करून त्यास मंजुरी देऊन अंतिम मंजुरीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करून वरिष्ठांची दिशाभूल आणि कामात अनियमितता केल्याप्रकरणी यांना निलंबित करण्यात आले आहे .
तालुक्यातील गिधाडे येथे दलित वस्ती सुधार योजनेच्या भूमिगत पाइपलाइनच्या गटारीचे काम केले आहे सदरचे काम उपअभियंता पंचायत समिती शिरपूर यांच्या कडील तांत्रिक 2 लाख 99 हजार रुपये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मंजुरी देण्यात आली होती. मात्र या कामाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी सदर कामाची चौकशी केली असता झालेल्या कामाचे मोजमाप न घेता मुल्यांकन करण्यात आल्याचे व मोजमाप पुस्तकात खोटे व चुकीचे मूल्यांकन नोंद केल्याचे निदर्शनास आले 13 जानेवारी रोजी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा व गटविकास अधिकारी वाय डी शिंदे यांनी संयुक्तरीत्या गिधाडे गावास भेट देऊन या कामाची चौकशी केली होती .चौकशीत सर्व कामाचे मूल्यांकन करत पूर्व मूल्यांकन एक लाख 44 हजार 266 होत असताना एक लाख 55 हजार रुपये 664 रुपयांचे मूल्यांकन काम केलेले नसताना मोजमाप पुस्तकात नमूद करण्याचे दिसून आले.
 याबाबत चौकशीअंती गटविकास अधिकारी वाय डी शिंदे यांनी पंचायत समितीचे बांधकाम विभागातील शाखा अभियंता आर आर पाटील आणि कनिष्ठ अभियंता v.m. चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मिळाल्याने या दोघांना निलंबित करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने