शिरपूरचा श्री.खंडोबा यात्रोत्सव रद्द



      शिरपूर- येथील महाराष्ट्राचे कुलदैवत व जागृत देवस्थान, श्री. खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सव सालाबादाप्रमाणे दिनांक २७/०२/२०२१ रोजी प्रारंभ होणार होता, परंतु कोवीड-१९ च्या प्रार्दभावाने व मा. जिल्हाधिकारी साो, यांचे आदेशाने जिल्ह्यातील यात्रा, आनंदमेळा यांना परवानगी नाकारल्यामुळे यंदाचा यात्रोत्सव श्री. खंडेराव बाबा विकास संस्थे तर्फे रद्द करण्यात आला आहे. साधारण १२ ते १५ दिवस चालणार्या या यात्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व दुर वरुन भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी दरवर्षी येत असतात. भक्ती भावाने भावीक या ठिकाणी नवस करतात व तो पूर्ण होतो अशी भाविकांची श्रध्दा आहे
     यात्रेसाठी यात्रेस येणारे व्यावसायीक, भांडेवाले, मसालेवाले, खेळणी, पाळणे व अनेक मनोरंजनाची साधने तसेच हॉटेल व्यावसायीक, नारळ विक्रेते यांचा यात्रा रद्द झाल्यामुळे हिरमोड झाला आहे. यात्रेत होणारी लाखो रुपयांची उलाढाल या वर्षी ठप्प होणार आहे. तसेच मार्केट कमेटी मध्ये देखील पशुबाजारांत लाखो रुपयांची उलाढाल होणार नसल्याने व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यात्रोत्सव रद्द झाला तरी, श्री. खंडेराव महाराज देवस्थान दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिरात हॉल मध्ये किंवा गाभाऱ्यात मास्क लावल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच संस्थेतर्फे- सॅनिटायजर ची व्यवस्था, सॅनिटायजरची फवारणी व स्वच्छता राखली जाणार आहे. तसेच एका वेळी २५ ते ३० भाविकांना हॉल मध्ये प्रवेश देण्यात येईल, गर्दी होऊ नये व लोक एकत्र येऊ नये यासाठी बॅरीगेटीगची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात येणार आहे व पुर्णपणे काळजी घेतली जाणार आहे.
      माघ शुध्द पौर्णीमेला दिनांक २७/२/२०२१ रोजी महाआरतीचा कार्यक्रम सकाळी ठिक ०९.१५ मी. प्रतिष्ठीत मान्यवरांच्या शुभहस्ते व मोजक्या भावीकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. गर्दी वाढू नये याची दक्षता घेतली जाणार आहे. या कामी आमदार काशिराम पावरा शि.व.न.पा. नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, जिल्हापरिषद अध्यक्षतुषार रंधे , भा.ज.पा. प्रदेश सदस्यबबनराव चौधरी, शि.व.न.पा. सर्व नगरसेवक तसेच प्रांताधिकारी विक्रम बांदल, तहसिलदार आबा महाजन, डी.वाय.एस.पी.अनिल माने , पी.आय हेमंत पाटील व त्यांचे सर्व सहकारी व पत्रकार बांधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभणार आहे. कोरोना प्रार्दुभाव वाढु नये, संसर्ग वाढु नये यासाठी सर्व नागरीकांनी मास्क लावावा, हात स्वच्छ धुवावे, गर्दी करु नये, डिस्टसींग ठेवावी, गर्दीत जाण्याचे टाळावे तसेच मंदिरात येणाऱ्या भावीकांनी शिस्तीने व शांततेने दर्शन घ्यावे असे आवाहन श्री. खंडेराव बाबा विकास संस्थेचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कोषाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव गोपाल मारवाडी, प्रमुख विश्वस्त गुलाब भोई, , श्रीहरी यादगीरीवार,  गोपाल ठाकरे, शरद अग्रवाल, स्विकृत सदस्य  भानुदास मोरे,  गोविंदराव मोरे,  नाना सोनवणे,  गजानन मगरे,  संजय बारी,  जगदीश बारी,  राजेंद्र धोबी,  प्रकाश भोई,  सुभाष भोई, अशोक राजपुत, संजय पाटील, पुजारी माधवराव मोरे, उत्तमराव मोरे व व्यवस्थापक  महेश देवकर व अरविंद राजपुत करित आहे. 

                                                                                                                                                                     

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने