मलकापूर:- 19 फेब्रुवारी 2021 शुक्रवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा संपर्क प्रमुख जिवनसिंग राजपूत यांनी मलकापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज नगर, हनुमान टॉकीज,संत गाडगेबाबा पुतळ्याजवळ,बाजीप्रभु नगर, छत्रपती चौक निमखेड येथेजाऊन पुष्पहार अर्पण करून राजे शिवछत्रपती यांना मानवंदना करून शिवजयंती उत्सव साजरा केला यावेळी शहरातील विविध शिवप्रेमी युवकांना भेट देऊन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या सध्या राज्यात करण्याचा वाढता प्रसार पाहता प्रशासनाने घातलेले निर्बंध यामुळे सार्वजनिक रित्या मोठ्या प्रमाणावर शिवजयंती जरी साजरा करताआले नाही तरी अत्यंत साध्या पद्धतीने राजांबद्दल आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देत शिवजयंती साजरा करण्यात आली व शिवछत्रपतींच्या आशीर्वाद घेऊन प्रेरणादायी काम करण्याचे युवकांना मार्गदर्शन केले.
Tags
news
