मुंबई(प्रतिनिधी )भीम आर्मी या सामाजिक संघटनेचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष युवकांचा बुलंद आवाज आंबेडकरी चळवळीतील आंदोलक मालवणी मालाड येथील सुरेश वाघमारे यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या शुभ दिनी दहिसर केतकी पाडा या ठिकाणी आजाद समाज पार्टी चे मुंबई अध्यक्ष दीपक हनवते यांच्या शुभ हस्ते उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन जिल्ह्याची कमान वाघमारे यांच्या खांद्यावर सोपविली असून आजाद समाज पार्टी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद उर्फ रावण यांच्या विचारांना प्रेरित अशी फौज संघटना निर्माण करून आजाद समाज पार्टी ची ताकत उभी करणार असल्याचे सुरेश वाघमारे यांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले यावेळी आकाश ओव्हाळ .प्रियांका वाघमारे .प्रभू नाथ बौध्द क्षीरसागर शिर्के आदी उपस्थित होते
Tags
news
