शिंदखेडा तालुक्यातील भाडणे येथे काल झालेल्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अवकाळी पावसामुळे सायंकाळी सात वाजता विजेच्या कडकडाटासह पाऊस व वाऱ्यामुळे शेतकऱ्याचा तोंडात आलेला घास पावसामुळे हिरवल यांनी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे
यावर्षी खरीप पिके बोंड आळी मुळे यामुळे कापूस पीक उत्पन्नापेक्षा जास्त खर्च झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला होता मात्र या गोष्टीला सारून रब्बी हंगाम चांगला येईल या आशेने कामाला लागला होता यामुळे रब्बी हंगामात गहू हरभरा मका ज्वारी दादर इत्यादी पिके घेऊन कर्जाने भांडवल उपलब्ध करून रात्रंदिवस मेहनत करून पिकांना पाणी देऊन पीक बहरदार दिसू लागत होते मात्र इन वेळेस दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावून वादळी वाऱ्यासह भडणे परिसरातील दादर गहू मका हरभरा इत्यादी पिके वाऱ्यामुळे व पावसामुळे भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास या पावसामुळे झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे आज सकाळी कृषी सहाय्यक भरत अहिरराव,भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांना सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांनी दिल्याने शेतकऱ्यांसह यावेळी पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याने रडू कोसळले व शासनाकडून मदतीची अपेक्षा यावेळी शेतकरी तर्फेकरण्यात आली
Tags
news