नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक : महाराष्ट्र म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! या वीरभूमीची शान असलेल्या सह्याद्रीच्या रांगेत असंख्य किल्ले उभे राहिले. सातवाहन काळापासून शिवकाळापर्यंत असंख्य किल्ल्यांनी महाराष्ट्राचा इतिहास प्रेरणादायी केला. हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.
या साठी सामाजिक कार्यात नेहेमी अग्रेसर असणारे आणि नेहेमी समाजपयोगी उपक्रम राबवणारे स्वामी विवेकानंद फाऊंडेशन तर्फे दर रविवारी निसर्ग प्रेमी एकत्रित येऊन मनमाड परिसरातील गड़किल्ले भटकंती सोबत स्वच्छ्ता मोहीम राबविण्यात येत आहे.
स्वामी विवेकानंद फाउंडेशन तर्फे किल्ले टंकाईवर भटकंती तसेच स्वछता मोहीम रविवार दिनांक 31/01/2021 रोजी मोहीम क्रमांक 01 किल्ले टंकाई येथे राबवण्यात आली , यामध्ये किल्ले टंकाई येथील महादेव मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. अशा प्रकारची स्वच्छता मोहीम ही दर रविवारी मनमाडच्या आजूबाजूच्या किल्यांची करण्यात येणार असून या मध्ये जास्तीत जास्त पर्यावरण आणि निसर्ग प्रेमींनी सहभागी व्हावे असे आव्हान स्वामी विवेकानंद फाऊंडेशन द्वारा करण्यात आलेले आहे.
Tags
news
