नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:दिंडोरी तालुक्यातील पुरवठा विभागाकडे सेतू कार्यालयाच्या माध्यमातुन,अनेक महिला पुरूष नागरिकांनी नविन शिधापत्रिकेसाठी,दुय्यम शिधापत्रिकेसाठी,नविन नावे शिधापत्रिकेत समाविष्ट करण्यासाठी,शिधापत्रिकेतील विविध कामांसाठी, गेल्या २ ते
३वर्षापासुन प्रकरणे जमा केलेली आहेत.मात्र त्यांच्याबद्दल
कुठलीही दखल घेण्यात आलेली नाही.नविन शिधापत्रिका वितरित केल्या जात नाही.शिधापत्रिकेच्या बाबतीत लुटारू दलालांचा सुळसुळाट झालेला आहे.जे दलालांना पैसे देतील त्यांचीच कामे आठ ते दहा दिवसात, कुठलीही सबब न सांगता त्वरित परिपुर्ण करण्यात येतात.मात्र निर्धन गोरगरिब शिधापत्रिकाधारकांची कामे जाणीवपुर्वक परिपुर्ण करण्यात येत नाहित. कार्यालयात निर्धन गरजवंतांना चकरा मारून पायातील जोडे झिजवावे लागत आहेत. मानवाधिकाराच्या पहिल्या पिढीचे हे उल्लंघन होत असुन,समान कायदयाची पायमल्ली करण्यात येत आहे.ही गरजवंत महिला पुरुष नागरिकांची आर्थिक, मानसिक,छळवणुक पिळवणुक असुन,पदपावली वेळोवेळी अन्याय करणा-या संबधीतांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
शिधापत्रिकाधारकांची कामे त्वरित मार्गी लावावी.अन्यथा मंगळवार दि.९फेब्रुवारी२०२१ रोजी,बहुजन समाज पार्टीतर्फे,तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा दिंडोरी तालुका पुरवठा अधिकारी निरभवणे यांना,निवेदनाव्दारे बहुजन समाज पार्टीचे राज्य सचिव तथा रेशन तक्रार निवारण कृती समितीचे सल्लागार:- कैलासभाई पगारे,यांनी दिला.
दोन दिवसात सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन तालुका पुरवठा अधिकारी निरभवणे यांनी दिले.आश्वासनाप्रमाणे तालुका पुरवठा अधिकारी कर्तव्यदक्षतेने वागतात की,नाही याकडे गरजवंत शिधापत्रिकाधारक नागरिक लक्ष वेधुन आहेत.
याप्रसंगी बहुजन समाज पार्टीच्या दिंडोरी विधानसभाध्यक्षा:-शैलाताई पितळे,शिवनई ग्रामपंचायत सदस्या:-संगिताताई पगारे,राष्ट्रीय शेतमजूर संघटना तालुकाध्यक्ष:-सिध्दार्थ निकम,मंगला गवारे,आर्यन पगारे,सिध्दांत पितळे,आदी बहुजन समाज पार्टीचे महिला पुरूष पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येनी उपस्थित होते.
Tags
news
