⭕ आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित; - अर्थमंत्री



 
करोना आणि लॉकडाउनमुळे अर्थचक्र रुतून बसले होते. 
याचा फटका जी.डी.पी.ला बसला. 
अनेक क्षेत्रांची पिछेहाट झालेली असताना कृषी क्षेत्राने अर्थव्यवस्थेला तारलं होतं. 
त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकऱ्यांना आणि शेतीसाठी काय तरतूद करणार याकडे लक्ष होतं. 
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित असल्याचं सांगत हमीभावाबद्दल भाष्य केलं. 
करोना संकटातही आशादायी वृद्धीझेप घेणाऱ्या कृषीक्षेत्राच्या वाढीस आणखी चालना दिली जाण्याबद्दल आशावाद व्यक्त करण्यात आला होता. 
अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या,”आमचं सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे. 
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेनं काम करत आहे.
 यु.पी.ए. सरकारच्या तुलनेत तीन टक्के जास्त निधी मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. 
प्रत्येक क्षेत्रातील शेतकऱ्याला मोदी सरकारकडून मदत दिली गेली.
 तांदूळ, गहू, दाळीसह इतर शेतमालांच्या हमीभावात वाढ करण्यात आली.
 शेतमालाच्या खरेदीला आणखी वाढवण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. 
२०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी कृषी कर्जाची उद्दिष्ट १६.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आलं आहे.
 त्याचबरोबर १ हजार कृषी बाजार ‘ई-नाम’शी जोडण्यात येणार आहे. 
कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ४० हजार कोटीपर्यंत निधी वाढवण्यात आला आहे. 
त्याचबरोबर सुक्ष्म जलसिंचनासाठी निधी दुप्पट करण्यात आला आहे,” असं सीतारामन म्हणाल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने