करोना महामारीमुळे पहिल्यांदाच आरोग्य विमा योजनेचं महत्व कधी नव्हे तितकं प्रकर्षाने समोर आलं आहे.
करोना संकटामुळे रुग्णालयात जवळपास लाखो रुपयांचा खर्च येत असताना ज्यांच्याकडे आरोग्य विमा योजना आहे त्यांच्यासाठी ते वरदानच ठरल्याचं सिद्ध झालं आहे.
फक्त करोनाच नाही तर आरोग्य विमा योजनेमुळे कोणत्याही आजारासाठी तुम्हाला तुमच्या सेव्हिंगला हात लावण्याची गरज भासत नाही.
यामुळे फक्त घरातील मोठ्यांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला पुरेसा आरोग्य विमा कवच असणं अनिवार्य आहे.
आजार किंवा अपघातामुळे रुग्णालयात दाखल होण्याची वेळ कधीही आणि कोणावरही येऊ शकते.
आरोग्य विमा संरक्षणासोबतच विम्याचा हफ्ता तुम्हाला कर कमी करण्यासही मदत करतो.
आरोग्य धोरणात कराचा लाभ हा मर्यादित असला तरी तो आपल्याला आपले कर उत्तरदायित्व कमी करण्यात आणि सोबतच आरोग्य विम्याचा लाभ उपभोगण्याचा मार्ग देतो.
आरोग्य विमा योजनेतील विमा हफ्त्यांवरील मिळणारा कर लाभ आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० ड अंतर्गत येतो.
यातील जास्तीत जास्त कर लाभ २५ हजार ते ५० हजारांपर्यंत आहे.
मात्र नेमका किती कर लाभ होणार हे तुमच्या वयावर अवलंबून आहे.
जर तुमचं वय ६० पेक्षा कमी असेल आणि तुम्ही स्वत:साठी किंवा ६० पेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंबातील इतर सदस्यासाठी आरोग्य विमा योजना घेत असाल तर आर्थिक वर्षात जास्तीत जास्त वजा होणारी रक्कम २५ हजार रुपये आहे.
त्याचप्रमाणे जर तुमचं वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर जास्तीत जास्त कर लाभ ५० हजारांपर्यंत आहे.
याचा अर्थ जर तुमचं वय ६० किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही तुमच्यासाठी आणि पालकांसाठी आरोग्य विमा योजना घेणार असाल तर १ लाखांपर्यंत कर लाभ मिळू शकतो.
Tags
news
