आंबेडकरी चळवळ जोपासणाऱ्या वाघ कुटुंबीयांचा सार्थ अभिमान-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे




नाशिक-:आज    नुकताच  रविवार रोजी करन्सी नोट प्रेस मधील कामगार नेते तथा आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते मा.रमेशजी वाघ यांचा सेवापूर्ती कार्यक्रम इच्छामणी लॉन्स उपनगर नाशिक येथे मोठ्या दिमाखदार सोहळा उत्साहात  संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात गांगुर्डे म्हणाले की नामांतर लढ्यात रमेशजी वाघ व त्यांचे कुटुंबीय सक्रिय होते प्रा.जोगेंद्र कवाडे सरांसोबत लॉंगमार्च मोर्चा तसेच भीमसैनिकांना वाघ कुटुंबीयांची अनमोल अशी साथ मिळाली त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तसेच भारताचे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब,सौ.सिमाताई रामदासजी आठवले यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कामगारांचे राष्ट्रीय नेते जगदीशजी गोडसे, पॅंथरचे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे  उपाध्यक्ष भिमश्री विजयराज पगारे, कामगार नेते सुनिलभाऊ आहिरे,अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहुल तुपलोंढे,युगांतर ग्रुपचे अध्यक्ष रवि पगारे नगरसेविका सुषमाताई पगारे,पॅंथर नेते यशवंत साळवे,मा.विलासजी गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी पगारे,मा.अरुणजी भोळे, युवा नेते विक्रांतजी गांगुर्डे व प्रभाग क्रमांक 16 मधील कार्यकर्ते नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बौध्दाचार्य प्रकाशजी जगताप यांनी केले तर सत्कार मुर्ती मा.रमेशजी वाघ यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने