शिरपूर शहरातील पाणीपट्टी सरसकट करा शिरपूर शहर शिवसेनेची मागणी






शिरपूर प्रतिनिधी- पूर्वी शिरपूर वासियांना  दिवसातून दोन वेळा शिरपूर वरवाडे नगर परिषद कडून पाणीपुरवठा होत होता त्यात देखील नागरिकांना मात्र वर्षभर फक्त पंधराशे रुपये पाणीपट्टी होती चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शिरपूरकर जनतेची दिशाभूल करण्यात आली नगरपरिषदेने चोवीस तास पाणी ही योजना राबविल्यानंतर  स्थानिक नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे सर्वसामान्यांना न परवडणारी पाणीपट्टी प्रत्येकासाठी डोकेदुखी झाली आहे  स्थानिक स्वराज्य संस्था येथे एक हाती सत्ता असल्याने प्रत्येक ठराव एकमताने मंजूर करण्यात येतात यात नागरिकांचा हिताचा विचार ना करता मनमानी कारभार केला जातो हे आहो लिखित सत्य आहे आजची वस्तुस्थिती पाहता नागरिकांना चोवीस तास पाणी उपलब्ध नाही तरीसुद्धा नागरिकांना दहा ते पंधरा हजार पर्यंत पाणीपट्टी दिली जात आहे दुसरीकडे संबंधित पाणीपट्टी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांना मानसिक त्रास देण्याचे काम सुरू केले आहे पाणीपट्टी बिल संदर्भात प्रत्यक्ष कार्यालयात गेल्यावर ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात येते व धमकी स्वरूपात दोन दिवसात पाणीपट्टी भरावी लागेल अन्यथा नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येईल अशी वागणूक प्रत्येक ग्राहकाला दिली जात आहे पाणीपट्टी संदर्भातील शिरपूर शहरातील अनेक वेळा उपोषणे व आंदोलन करण्यात आले परंतु नगर परिषद  सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाणी संदर्भातील गंभीर्याने विचार केला नाही महाशय आपण शासकीय अधिकारी असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या भावना समजून आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घेऊन शिरपूरकर वासियांना पूर्वी सारखी पाणीपट्टी सरसकट करावी  असे निवेदन आज नगर परिषद मुख्या धिकारी यांना देण्यात आले आहे, मागण्या पूर्ण न झाल्यास  येणाऱ्या काळामध्ये शिरपूर शहर शिवसेना च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पाणी प्रश्नाच्या हितासाठी तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल यावेळी भरत सिंह राजपूत उपजिल्हाप्रमुख ,छोटू सिंग राजपूत विधानसभा क्षेत्र प्रमुख, राजू टेलर एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष ,विभा जोग्रणा उपजिल्हा संघटक, दीपक चोरमले तालुकाप्रमुख ,मनोज धनगर शहर प्रमुख ,प्रेम कुमार चौधरी शहर संघटक, योगेश ठाकरे उपशहर प्रमुख ,बंटी लांडगे उपशहर प्रमुख ,विकास महिरराव उपशहरप्रमुख, सिद्धार्थ बैसाने अनिकेत बोरसे युवा सेना तालुका अधिकारी, विजय पावरा युवा सेना तालुका अधिकारी ,गोलू मराठे युवा सेना शहर अधिकारी, सचिन शिरसाट, शिरपूर शहर समन्वयक, जितेंद्र पाटील महाराष्ट्र वाहतुक सेना शहराध्यक्ष, मसूद शेख, जावेद शेख ,वाजीत मलक, विजू पवार, पंकज मराठे, शाकिर कुरेशी, इद्रिष शहा, बंडू सोनार, पिंटू शिंदे ,अमोल ठेलारी, कुरेश खाटीक तुषार महाले पंकज बैसाने ,बाबा शहा ,आसिफ शहा, जावेद शहा, अजीम पठाण, भूषण अग्रवाल,  समाधान वाघ, व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक व त्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने