धुळे, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील मंगळवार 9 फेब्रुवारी 2021 पासून धुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
मंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : मंगळवार 9 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 1.30 वाजता धुळे शहर येथे आगनम व राखीव, दुपारी 2 ते 3 या कालावधीत धुळे जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक, दुपारी 3 ते 4 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धुळे जिल्हा कार्यकारिणी बैठक व धुळे विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सायंकाळी 4 ते 4.45 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, धुळे ग्रामीण कार्यकारिणी बैठक, सायंकाळी 6 ते 7.30 या कालावधीत धुळे येथे राष्ट्रवादी परिवार संवाद. सायंकाळी 7 ते 9 या कालावधीत राखीव व मुक्काम. बुधवार 10 फेब्रुवारी 2021 सकाळी 8.30 वाजता धुळे येथून साक्रीकडे प्रयाण, सकाळी 10 ते 11.15 या कालावधीत साक्री येथे आगमन व साक्री विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सकाळी 11.30 वाजता नंदुरबारकडे प्रयाण, सायंकाळी 6.10 ते 7 या कालावधीत शिंदखेडा येथे आगमन व शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सायंकाळी 7 ते 8 राखीव, रात्री 8 वाजता शिरपूरकडे प्रयाण, रात्री 8.30 वाजता शिरपूर येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 11 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10 ते 10.45 या कालावधीत शिरपूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, सकाळी 10.45 वाजता शिरपूर येथून पाडळसरे, ता. अमळनेर, जि. जळगावकडे प्रयाण.
Tags
news