एच. आर. पटेल कन्या विद्यालयाची चेतना भट राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकाची मानकरी




 शिरपूर : येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी चेतना अनिरुद्ध भट हिने सेंटर फॉर इंडियन आर्ट रिसोर्सेस अँड ट्रेनिंग मुंबई द्वारा आयोजित राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत नॅशनल चाइल्ड आर्टिस्ट अवार्ड प्राप्त केले. तिला सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्राप्त झाले. राज्यस्तरीय स्पर्धेत चेतना भट हिने महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादन केले आहे.

तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आ. अमरीशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा, विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. पाटील, पर्यवेक्षक जे. पी. पाटील, पी. एस. पाटील, आर. व्ही. महाले यांनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थिनीस विद्यालयातील कलाशिक्षक के. एल. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने