बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे गावाची ओळख एक तिर्थ क्षेत्र म्हणून झाली असतांना येथील जिल्हा परिषदेची जिर्ण झाल्यामुळे शेवटच्या घटका मोजत आहे कदाचित् जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागाला एखाद्या विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट तर पाहत नाही ना असा प्रश्न शिवसेनेचे तालुका उपप्रमुख तथा उपसरपंच महावीर जैन यांनी उपस्थित केला आहे. गावाची जिल्हा परिषदेची मराठी शाळा जुनी इमारत झाली अपघाताला निमंत्रण देणारी ही जीर्ण इमारत किंवा कोसळेल याचा भरवसा राहिलेला नाही त्यासाठी विद्यार्थी येथे येत असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो दुर्दैवाने विद्यार्थ्यांना इजा झाली तर त्याला जबाबदार शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहणार शिवसेना उपतालुका प्रमुख उपसरपंच महावीर जैन यांनी प्रसिद्ध प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात त्याची आवश्यकता भासली नाही परंतु आता शाळा चालू होण्याच्या पहिले जुन्या शाळेजवळ नवीन डिजिटल शाळेची इमारत आहे.शाळा भरण्याच्या अगोदर व मधल्या सुट्टीत अनेक विद्यार्थी जुन्या इमारतीच्या ओट्यावर खेळताना दिसून येतात या पडक्या इमारतीच्या प्रश्न विद्यार्थ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बनला आहे मात्र याकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कारण जीर्ण इमारती धोकादायक झाली असून त्यात वारंवार विषारी सापांचा वावर आढळून येतात इमारतीच्या भिंती संध्या तून सुटलेल्या असून कोणत्याही क्षणी पडू शकतात आणि शाळेच्या मागील बाजूला ग्रामस्थ असतात त्यांना सुद्धा या अपघाताची चिंता झाली आहे. तसेच छतावरील कौले सतत पडत असतात. या अश्या धोकादायक इमारतीच्या दुर्घटनेत विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका झाल्यास प्राथमिक शिक्षक विभागाचे अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा शिवसेना उपतालुका प्रमूख व उपसरपंच महावीर जैन यांनी दिला आहे.
Tags
news