संत गाडगेबाबांची जयंती उत्साहात साजरी



शिरपूर  स्वच्छतेचे प्रसारक राष्ट्र संत गाडगेबाबा यांची जयंती शिरपूर शहरात मोठ्या साजरा करण्यात आली यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेच्या प्रांगणात असलेल्या संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,प्रा.सदाशिव ठाकरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
     यावेळी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशान रंधे म्हणाले, संत गाडगेबाबांचे विचार आपण सगळ्यांनी जोपासले पाहिजेत. त्यांचा स्वच्छतेचा आदर्श आपण सगळ्यांनी कायम घेतला पाहिजे. समाज बांधव विविध काम व व्यवसाय करीत असताना स्वच्छता पाळली पाहिजे. सध्या कोरोनाची  परिस्थिती आहे. त्यामुळे व्यवसाय करण्याबरोबरच आपण स्वच्छतेवर ही लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून आपली प्रकृती व तब्येत चांगली राहील याकडे जाणीवपूर्वक सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. हाच स्वच्छतेचा विचार गाडगेबाबांनी आपल्याला दिलेला आहे.
   नुकतेच सोमवारी  महाराष्ट्र प्रदेश परीट धोबी समाज आरक्षण कृती समिती अध्यक्ष रमाकांत कदम यांचे  निधन झाले होते. त्यांना यावेळी  श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यक्रमाला परीट समाजाचे शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर ईशी युवा अध्यक्ष योगेश धोबी छोटू धोबी गोलू बोरसे जितेंद्र निकम सुनील सूर्यवंशी यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने