शिरपूर : मध्यप्रदेश राज्यात शिरपूरचा मुकेशभाई पटेल तालुका क्रिकेट असोसिएशनचा संघ ठरला उपविजेता ठरला असून यशस्वी क्रिकेट खेळाडू यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मध्यप्रदेश राज्यात बडवानी जिल्ह्यात सिलावद येथे सिलावद शासकीय माध्यमिक शाळेच्या मैदानावर ग्रीन हिल क्रिकेट क्लब सिलावद यांच्या मार्फत जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या सौजन्याने अखिल भारतीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व महाराष्ट्र राज्यातील नामांकित १६ संघांना निमंत्रित करण्यात आले होते. शिरपूरच्या मुकेशभाई पटेल तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूरच्या संघाने या स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग नोंदविला व उज्जैन, उदयपूर, जळगाव सारख्या बलाढ्य संघांना नमवत थेट अंतिम सामन्यापर्यंत संघाने मजल मारली.
स्पर्धेत उपविजेता व स्पर्धेतील सर्वात शिस्तबद्ध संघ म्हणून शिरपूरच्या मुकेशभाई पटेल तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूरच्या संघाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरा यादव व अन्य मान्यवरांच्या हस्ते संघाला रोख रक्कम व भव्य चषक पारितोषिक म्हणून देण्यात आले.
या स्पर्धेत संघातर्फे कर्णधार कुणाल गिरासे, मेहुल पटेल, प्रशांत ढोले, लोकेश देशमुख, दिपक जगताप, आनंद जगताप, संमेक जगताप, अनिकेत मोरे, फरदीन शेख, अबू शेख, रामेश्वर पाटील, तरवेश पाटील, धीरज पाटील, प्रफुल्ल धनगर या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. क्रिकेट प्रशिक्षक राकेश बोरसे व संदीप देशमुख यांचे संघाला मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, संचालक चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, सर्व संचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी कौतुक केले.
Tags
news