बोरगाव येथे वर्धिणी आमसभा संपन्न






बोरगाव - दि 27/02/2021 रोजी वनावल प्रभागातील बोरगाव या गावामध्ये उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत वर्धिणी आमसभा, जिल्हा अभियान व्यवस्थापक (DMM) श्री उद्धव धारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. 

बैठकीला गावातील सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, वनावल प्रभागाचे प्रभाग समन्वयक दत्तात्रय खराडे, पोलीस पाटील मनोहर पाटील, साक्री तालुक्यातील वर्धिनी रीमा बच्छाव, शितल देसले, राजश्री पवार नंदिनी अहिरे व ग्रामस्थ महिला उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागा तर्फे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष डी.आर.डी.ए व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती शिरपूर मार्फत 13 ते 27 फेब्रुवारी 2021 दरम्यान 15 दिवसीय निवासी वर्धिनी फेरी शिबीर घेण्यात आले होते.

जिल्ह्यात वर्धिनी म्हणून निवड झालेल्या वर्धिनी गावात 15 दिवस मुक्कामी राहून गावातील पात्र गरीब कुटुंबांचे सर्व्हेक्षण करून महिलांचे स्वयं सहाय्यता समूह तयार केलेत.

धुळे येथुन आलेले जिल्ह्याचे जिल्हा अभियान व्यवस्थापक श्री उद्धव धारणे यांनी उपस्थित महिलांना दशसुत्री उपजीविका, पंचायतराज संस्थांमध्ये घ्यावयाचा सहभाग, ग्रामंसंघाचे महत्व, गरज, भविष्यात होणारे फायदे, ग्रामसंघाच्या समित्या, त्यांचे महत्त्व, जबाबदार्‍या तसेच  गावात अभियान सुरू झाल्यानंतर  महिलांनी गरीबी उच्चाटनासाठी घ्यावयाचा पुढाकार यावर मार्गदर्शन केले.  

यावेळी बोरगावचे सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी 15 दिवस आपले कुटुंब सोडून गावात राहणाऱ्या वर्धिनींचे व उमेद अभियाना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच गावातील ग्रामस्थ महिलांनी ही खरी महिला सक्षमीकरण व महिलांचे प्रश्न महिलांच्या व गावाच्या सहभागाने सोडण्याचे अभियान असल्याचे प्रतिपादन करून सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले. प्रभाग समन्वयक दत्तात्रय खराडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

सर्व महिलांच्या अनुमतीने बोरगाव  समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून म्हणून सौ वैशाली मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आभार रीमा शरद बच्छाव रा. दहीवेल ता. साक्री यांनी केले. वर्धिनी राऊंड चे आयोजन  करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वान्मथी मॅडम, प्रकल्प संचालक श्री. बी. एम. मोहन, शिरपूर गटविकास अधिकारी शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने