थाळनेर पोलिसांनी अवैधरित्या वाहतूक करणारा कंटेनर वर कारवाई करत
52 जनावरसह 17 .80 लाखांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे.
आज दि.28 फेब्रुवारी रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत शिरपूर/चोपडा रोड तोंदे गावा जवळ गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा कंटेनर पकडला असून त्यात 52 गोवंशीय जनावरे मिळून आले आहेत.सदर जनावरे सावेर येथील गोशाळेत पाठविण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यातील 3 आरोपी हे पोलिसांना पाहून पळ काढूत फरार झाले आहेत. या कारवाईत गोवंश जनावरे व पकडलेले वाहन असा 17 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,
पी.एस.आय .नवनाथ रसाळ, पो कॉ.प्रकाश मालाचे,कृष्णा पावरा ,उन्मेष आळनडे इत्यादींच्या पथकाने केली आहे.
Tags
news
