प्रतिनिधी, शिरपूर
वाढत्या महागाईमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भीडले आहेत. दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचे भाव सर्वसामान्यांना न परवडणारे आहे. मात्र दुसरीकडे गरीबांना हक्काच्या घरात राहता यावे. या उदात्त हेतूने सुरू केलेल्या घरकूल योजनांना शासनाकडून मिळणारा निधी अत्यंत कमी आहे. पंतप्रधान घरकूल योजनेसाठी मिळणारा निधी वाढवून अडीच लाख करण्याची मागणी बिरसा क्रांती दलाने मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, ग्रामविकास मंत्री, मुख्य सचिव, सीईओ धुळे यांच्याकडे बीडीओ यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली.
घरकूल निर्माणासाठी लागणारे सिमेंट, वाळू, विटा, डबर, मजूरी, लोखंड यांचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. वाढत्या महागाईमूळे लाभार्थी आपले घर बांधू शकत नाही. घरकूल पूर्ण करण्यासाठी कर्ज काढावे लागते.
त्यामुळे सरकार कडून प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत मिळणाऱ्या घरकूलची रक्कम 2,50000 (अडीच लाख) पर्यंत वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आली. जेणेकरून लाभार्थी आपल्या हक्काचे घरकूल पूर्ण करेल असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी बिकेडीचे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,जिल्हा महासचिव विलास पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, उपाध्यक्ष सखाराम पावरा, प्रसिद्धि प्रमुख मद्रास पावरा, संघटक काकड्या पावरा आदी उपस्थित होते.
Tags
news
