शिरपूर : विश्व मानव रूहानी केंद्र मार्फत अनेक ठिकाणी गरजूंना मोफत ब्लँकेट वाटप करण्यात आले.
विश्व मानव रूहानी केंद्र शाखा आंबे, जामन्यापाडा, नटवाडे तालुका शिरपूर अंतर्गत झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांना, गरजूंना सोमवारी 22 फेब्रुवारी रोजी मोफत ब्लँकेटचे वाटप शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, शिरपूर तालुका सांगवी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, शिरपूर तालुका सांगवी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, धोंडू नाटू चौधरी, निगरण सदस्य दिलीप माळी, सुरेश पावरा, प्रशांत पाटील, पिंटू भोई, महेंद्र चौधरी, मुकेश पावरा, दिनकर टेलर, वामनराव तसेच विश्व मानव रुहाणी केंद्र आंबे व जामन्यापाडा येथील सेवेदार उपस्थित होते. विश्व मानव रूहानी केंद्राचे सर्व सदस्यांनी मनापासून सेवा देण्याचा प्रयत्न वेळोवेळी नियमितपणे केला आहे, याबाबत यावेळी सर्व सेवेदार यांचे आभार मानण्यात आले.
Tags
news
