दौंड तालुक्यातील यवत येथील कामगार जीवन नारायण कडोले हा बेपत्ता, शोध सुरू




दौंड तालुक्यातील यवत येथील कामगार जीवन नारायण कडोले हा दिनांक 15/02/2021  दुपारी पाच च्या सुमारास यवत  येथुन बेपत्ता झाला आहे. जीवन कडोले हा मुळगाव मध्यप्रदेश येथिल रहीवाशी आसुण सध्या यवत येथिल गुर्हाळावर मजुर म्हणून काम करित होता. जीवन कडोले बेपत्ता झाल्याची फिर्याद भाऊ रूपचंद कडोले यांनी यवत पोलिस स्टेशनला दिली असुन यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार व्ही.एम.जगताप पुढील तपास करित आहेत. बेपत्ता जीवन कडोले यांचे थोडक्यात वर्णन व माहिती व्यवसाय- मजुरी यवत, मुळ गाव मध्यप्रदेश, वय 42 वर्ष, उंची 164 से.मी. फुट, रंग काळा सावळा, सडपातळ बांधा, अंगामध्ये काळ्या रंगाचा शर्ट व पांढर्या रंगाची पॅन्ट. तरी वरील व्यक्ती बद्दल कोणाला काही माहिती समजली असता त्वरित यवत पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन  पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे .फोन नंबर यवत पोलिस स्टेशन 02119274233, किंवा  -8668242002, 9926926487 वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने