शिरपूर च्या कार्तिक पटेल यूपीएससीत देशात सातवा आर्मीत अॕसिस्टंट कमांडर पदावर नियुक्ती




 शिरपुर येथील  रहिवासी   कार्तिक शरद पटेल यांची २०१९ च्या झालेल्या  केंद्रीय लोकसेवा आयोग  अंतर्गत झालेल्या परीक्षेत  सेंट्रल आर्मड पोलीस फोर्सेस  मध्ये गुणवत्ता निवड यादीत सातव्या  क्रमांकाचे यश सःपादन केले आहे. त्याची आर्मीत अॕसिस्टंट कमांडर पदावर नियुक्ती  झाली आहे.
     कार्तिक शरद पटेल ह्यांनी 
 प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आर.सी.पटेल इंग्रजी माध्यमिक शाळा शिरपूर तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणा आर.सी.पटेल मेन बिल्डिंग   येथे झाले आहे.तसेच
बी टेक सिविल इंजीनियरिंग या विषयात मुंबईच्या नामांकित व्हीजीआयटी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेली आहे.
कार्तिक पटेल याने वजीराम व रवी आएएस इन्स्टीट्युट नवी दिल्ली येथून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन  घेतले आहे. त्याने  2019 मध्ये केंद्रीय आर्मड पोलीस फोर्सेस च्या , अंतर्गत असिस्टंट कमांडंट  या पदासाठी स्पर्धा परीक्षा दिलेली होती. ही परीक्षा त्यांनी उच्च श्रेणीत गुणवत्ता प्राप्त करत भारतातून  7 वा  क्रमांक प्राप्त करत घवघवित यश प्राप्त केलेले आहे.
 कार्तिक पटेल  गेल्या तीन ते  साडेतीन वर्षांपासून या परीक्षेसाठी अहोरात्र मेहनत करत होते. त्याचे फळ  प्राप्त झालेले आहे. .शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती याला संधीत रूपांतर करून   या यशाला गवसणी घातले आहे 
कार्तिक पटेल  यांचे वडील शरद पटेल हे पातोंडा ता.नंदुरबार   ह.मु.मयुर काॕलनी शिरपूर  चे रहिवासी आहेत. सर्वसाधारण सामान्य शेतकरी असून त्यांच्या मुलाने केलेली ही कामगिरी निश्चितच युवकांसाठीव समाजासाठी कौतुकास्पद आहे.
 कार्तिक पटेल यांच्या यशानिमित्त मयूर कॉलनी शिरपूर येथे फटाक्यांच्या आतषबाजीने आनंद साजरा करण्यात आला माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल शिरपूरच्या नगराध्यक्षा जयश्री बेन पटेल उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल प्रभाकर चव्हाण राजगोपाल भंडारी अशोक कलाल आरसी पटेल कनिष्ठ महाविद्यालय में बिल्डिंग चे प्राचार्य पी व्ही पाटील व मयूर कॉलनी च्या रहिवाशांनी  अभिनंदन केले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने