नगरसेवकाच्या घरी डाव फसला,अन्य ठिकाणी धाडसी चोरी....




*नुतन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना चोरांचे आव्हान, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी..

.(प्रभाकर आडगाळे दोंडाईचा प्रतिनिधी.)

*दोंडाईचा-* सध्या शहरात चोर व चोरींच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पहाटे चार वाजेच्या सुमारास गजबजलेल्या शिंदी समाजाच्या वसाहतीत पाच अज्ञात तरूणांनी चेहऱ्यावर माँस बाधत हातात कटर,हत्यार साहित्य वापरत नगरसेवकाच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण घरात त्यांची सुनबाई जागी झाल्याने चोरीचा डाव फसला व पुढील अन्य चार ठिकाणीपैकी दोन ठिकाणी मोटरसायकल हाती आल्यावर पेट्रोल अभावी रस्त्यावर सोडावी लागली तर दोन गरिब जणांकडे मात्र त्यांनी घटनेला तडीस नेले आहे. त्यामुळे गजबजलेल्या वसाहतीत असा प्रकार होत असेल तर विखुरलेल्या काँलनी परिसरात हे चोर काय परिस्थिती निर्माण करू शकतात, ह्या विचाराने सर्वसामान्य नागरिक भयभीत झाले आहे. म्हणून नव्यानेच दोंडाईचा पोलीस स्टेशनला रूजू झालेले पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर वारेसाहेब यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्यांनी चोरींच्या घटनांसह इतरही गुन्ह्यांवर अंकुश मिळवावा,अशी रास्त अपेक्षा गावातील जाग्रूत नागरिक करत आहे.

याबाबत घडलेली सविस्तर माहिती अशी की,आज सकाळी सात वाजता आम्हाला शिंदी काँलनीतील रहिवासी माजी पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक श्री किशनचंद दोधेजा यांचा फोन आला की, काँलनीत आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाच अज्ञात तरूण चेहऱ्यावर माँस बांधून, हातात कटर वगैरेसह साहित्य घेत धाडसी चोरी करण्याच्या इराध्याने आली होती. त्यात माझ्याकडेही त्यांनी गेटचे कडीकुलूप तोडून आत प्रवेश मिळवला, पण सुनबाई वेळेवर जागे झाल्याने त्यांचा डाव फसला व ते उलट्या पायाने पुढे सरकले.मात्र यावेळी त्यांनी काँलनीतील दोन गरिब, सर्वसामान्य परिवाराच्या घरी चोरींच्या घटनेला तडीस नेले आहे, तर अन्य दोन ठिकाणी हाती आलेल्या मोटारसायकल पेट्रोल अभावी काँलनी बाहेरील रस्त्यावर सोडून दिल्या आहेत, अशी माहिती दिली. यावेळी जनमतच्या टिमने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी चोरांनी सुरूवातीला समाजाचे रोडावर असलेले प्रेमकुटीर मंदीराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पण तेथे त्यांना काही हाती आले नाही. म्हणून त्यांनी सामानाची नासधूस करत खुर्च्या अस्तव्यस्त फेकल्या. त्यानंतर मग नगरसेवक श्री किशनचंद दोधेजा यांच्या घराकडे वळत, घराचे गेट तोडले तेथेही सुनबाई जागी झाल्याने हाती काही लागले नाही. मग तेथुन पुढेच कै.घनश्यामराय सतीषराय शर्मा यांची मिसेस भुसावळला गेलेली असल्याने, बंद घर सापडले.तेथेही त्यांनी कपाटे उघडत,टि.व्ही रूमची झडती घेत हातसाफ केला आहे. त्यानंतर पुढे श्री राजेश्वर उर्फ रज्जू किसन कुकरेजा यांच्या घरातून पंधरा हजाराच्या आसपास रोकड लंपास केली आहे. तसेच शेवटी भजनलाल एजन्सीचे मालक श्री ज्ञ्यानचंद भजनलाल केसवानी यांच्या घराकडे मोर्चा वळवत त्यांनी लोखंडी गेटचे कुलूप तोडत घरापुढे लावलेल्या युनीकाँन नावाची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१८-एक्यु-३६७४,व बजाज डिस्कवर नावाची मोटारसायकल क्रमांक एम.एच.१८-०४१९  आदी दोन मोटरसायकली चालू करून घेऊन जाणाच्या तयारीत असतांना श्री ज्ञ्यागचंद केसवानी यांच्या पत्नीच्या लक्षात आले व त्यांनी लागलीच आरडाओरड करत घरच्यांना उठवले.त्यावेळी चोरांनी पितळ उघडे पडल्याचे पाहत गाडी घेऊन पळ काढला.मग घरातील मंडळींनी आजुबाजूच्या ,शेजाऱ्यांची मदत घेत त्यांचा पाठलाग केला.तेव्हा कुठे जावुन त्यांनी गावाबाहेरील रस्त्यावर शेतात चालू गाड्या अंधाऱ्यात फेकून पळ काढला. तेव्हा गाडी मालकांनी गाड्या हस्तगत करत सुटकेचा श्वास घेतला. याबाबत दोंडाईचा पोलीसांनी घटनास्थळी भेट देत, पोलीस स्टेशनला उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सध्या दोंडाईचा पोलीस स्टेशनला नव्यानेच अधिकारी म्हणून श्री ज्ञानेश्वर वारेसाहेब लाभले असुन, गावात मागील तीनचार दिवसात चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली आहे.म्हणून नवीन साहेबांनी चोरांच्या सलामीला उत्तर देत,अंकुश मिळवत,रात्रींची ग्रस्त वाढवण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने