मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा






मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि मराठी भाषा दिवस दरवर्षीप्रमाणे काशिनाथ धुरु हॉल, दादर -पश्चिम येथे संध्याकाळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. 
या निमित्ताने दासावाचे दिवंगत प्रमुख कार्यवाह दत्ता कामथे यांच्या स्मरणार्थ "डिजिटल युग : मराठी वाचन संस्कृतीला तारक की मारक" तर दिवंगत कामगार नेते वसंतराव होशिंग यांच्या स्मरणार्थ "माझा मराठीची बोलु कौतुके" या विषयावर शब्दमर्यादा १२०० असलेली खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली असून संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी त्यांची घोषणा केली आहे. प्रत्येकी ५ रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.  युनिकोड फॉंट मध्ये टाईप करून दि १५ फेब्रुवारी पर्यंत लेख chalval1949@gmail.com यावर पाठवावेत असे आवाहन प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने