शिरपूर प्रभाग क्र. १३ वरवाडे मध्ये घरोघरी स्वच्छ सर्वेक्षण व वेबपोर्टल व्दारे हरित शपथ




शिरपूर : राज्य शासनातर्फे संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शिरपूर वरवाडे नगर परिषद अंतर्गत माजी मंत्री अमरीशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, उपनराध्यक्ष भूपेशभाई पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरसेविका सौ. चंद्रकला संतोष माळी, नगरसेवक दिपक महादू माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.

शहरात प्रभाग क्र. १३ वरवाडे येथे परिसरात स्वच्छ सर्वेक्षण घरोघरी जावुन प्रत्येक व्यक्तीला माहिती देऊन  स्वच्छ सर्वेक्षण व वेबपोर्टलव्दारे हरीत शपथ घेण्यात आली. या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, माळी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, सा. कार्यकर्ता भालेराव माळी, महादु माळी, वसंत माळी, विजय बागुल सर, लक्ष्मण महाराज, प्रकाश पाटील, त्र्यंबक माळी, सोनू माळी, विक्की माळी, जय माळी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रभागातील सर्व नागरीकांचे सहकार्य लाभले. या सर्व अभियानास भूपेशभाई फ्रेंडस सर्कल अंतर्गत विकास योजना आपल्या दारी अभियानाचे सचिन चौधरी, आकाश बागले, सागर दोरीक, विश्राम पावरा, सचिन राजपूत, किरण रायसिंग, निलेश पवार, भुपेश सालवे, संदिप मालचे, निलेश वाघ, रोहित माळी, अनिल सोनवणे, महेश पाठक, विशाल पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने