शिरपूर - आज दिनांक 4 - 2 - 2021 रोजी सकाळी भा ज पा जनसंघाचे जेष्ठ नेते , माजी आमदार व शिरपूर नगरीचे नगराध्यक्ष , आमचे सर्वांचे आधारस्तंभ , अखंड प्रेरणास्त्रोत , श्रध्देय तात्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील यांच्या 25 व्या पुण्यतिथी निमीत्त विविध ठीकाणी प्रतिमा पूजन व अभिवादन कार्यक्रम हनुमान व्यायाम शाळा , सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,शिरपूर भा ज पा कार्यालय , तसेच शिरपूर वरवाडे नगर परिषद मिटिंग हॉल येथे पार पडले , त्यावेळी नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन अमरिषभाई पटेल , प्रदेश सदस्य तथा नगरसेवक बबन भाऊ चौधरी , जेष्ठ नेते दिलीप आप्पा लोहार , तालुकाध्यक्ष किशोर नाना माळी , शहर अध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत गुलाबराव पाटील , नगरसेवक भुराभाऊ राजपूत , नगरसेवक रोहित भाऊ शेटे , नगरसेवक अमोलभाऊ पाटील , चंद्रकांत भाऊसाहेब पाटील , अरुण धोबी ,संजय आसापुरे , विक्की चौधरी , नगरपरिषद इंजिनिअर माधवराव पाटील , नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी , संजय अग्रवाल , अरविंद वैद्य , श्रीमती मोरे मॅडम , यांनी कैलासवासी तात्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन केले , यावेळीं नगरपरिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी , सरस्वती विद्यालयाचे सर्व शिक्षक , आणि शिरपूर शहर व तालुक्यातील भा ज पा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ....
Tags
news
