कोरोना संदर्भात दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई



शिरपूर प्रतिनिधी-  राज्यात कोरोणाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. मात्र शिरपूर तालुक्यात नागरिकांच्या मनातून कोरोणाची भीती गेली असून नागरिक बिनधास्तपणे फिरत असून शासनाने आदेशित केलेले कोरोणा बाबतचे नियम, मास्क, सॅनिटायझर सोशल डिस्टंसिंग इत्यादीबाबत नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. 


मागील दोन दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा यांनी विना मास्क  फीरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत .
मात्र तरी देखील नागरिकांचीही बेफिक्री इतरांच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकते म्हणून  उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बादल, तहसीलदार आबा महाजन सो,व पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी आज शिरपूर शहरात या बाबत जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरून नियम आणि कायदे यांचे पालन करण्याचे आवाहन केले व विना मास्क फिरणाऱ्यांना  दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली.



कोरोनावर लस आली  असली व कोरोणा या आजाराचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी कोरोणाचे संकट अजून देखील गेलेले नाही याची जाणीव ठेवत नागरिकांनीही जबाबदारीने शासन नियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आज रोजी शिरपुर शहरात बाजारपेठ, भाजी मार्केट  येथे पायी पेट्रोलिंग दरम्यान दुकान मालक व ग्राहक यांना कोविड-19 संदर्भात शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्यांचे तंतोतंत पालन करणे बाबत सुचना देण्यात येवुन विना मास्क च्या केसस करण्यात आल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने