शिरपूर प्रतिनिधी - धुळे जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांना शासनाकडून मिळणारे मानधन त्वरित मिळावे यासाठी खान्देश ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना मार्फत गटविकास अधिकारी शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे .
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचे सन 2019 सप्टेंबर पासून ते जानेवारी 2021 पर्यंत मानधन प्रलंबित आहे .ग्रामरोजगार सेवकांना मानधन अभावी उपासमारीची सामना करावा लागत आहे. कोरोणा काळात देखील ग्राम रोजगार सेवक गावपातळीवर नियमित काम करत आहेत. परंतु शासनाकडून अनुदान मंजूर न झाल्याने ग्राम रोजगार सेवक आर्थिक विवंचनेत आहेत. तरी सदर निवेदनाची दखल घेऊन ग्राम रोजगार सेवकांचे मानधन मंजूर करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे .अन्यथा संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे सदर निवेदनावर ऍड हिरालाल परदेशी एडवोकेट संतोष पाटील व ग्राम रोजगार सेवक यांच्या सह्या आहेत.
Tags
news
