धुळे- राज्यस्तरीय बालपरिषदेसाठी मनिष कापडे,देवयानी धोबी,हर्षल पाटील,खगेश राजपूत, राजवर्धन देवरे या पाच विदयार्थ्यांची निवड सलाम मुंबई फांऊडेशनच्या वतीने निवड करण्यात आली आहे.
सलाम मुंबई फांऊडेशनतर्फे तंबाखूमुक्त शाळा अभियानाची गति वाढविण्याच्यादृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु असून आँनलाईनद्ववारे प्रशिक्षण सत्रांचे आयोजन झूम आँनलाईनद्वारे करण्यात येणार आहे.त्यात तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती,सत्यता,स्वओळख,आणि आत्मविश्वास,संवादकौशल्य,सवयीची जडणघडण,वाईट सवयी नाकारण्याचे कौशल्य शाळास्तरावरील बालपंचायतीची भूमिका व जबाबदारी,समस्या सोडविण्याच्या पध्दती व सामाजिक समर्थन संकल्पना,ध्येयनिश्चिती ओळख,तंबाखू नियंत्रण कायदा.2003,कौशल्य विकास नेतृत्व आणि लेखन कौशल्य,मिडीया आणि मिडीयाचे प्रकार,पोलीस विभाग,अन्न व औषधी प्रशासन,यांचे सोबत काम करणे इत्यादी विषयांवर विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
राज्यातील 11 जिल्हातील विद्यार्थ्यांची या बाल परिषदेत सहभाग आहे. भविष्यातील पिढी तंबाखू मुक्त , आरोग्यसंपन्न व व्यसन मुक्त राहावी या हेतूने शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रभावी पणे कार्य सुरू आहे. तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले या चळवळीस अधिक बळकटी यावी. हा या बालपरिषदेमागचा हेतु आहे. नोहेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 दरम्यान या ऑनलाइन सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
समाजासोबत काम करणे,अभिप्राय आणि प्रतिक्रिया,प्रश्न उत्तरे,बालपरिषदेत सहभागी अधिकारी वर्गाकरिता प्रश्न सुनिश्चित करणे,तसेच शिक्षण,आरोग्य,पोलिस,अन्न औषधी प्रशासन,राष्टीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी,सलाम मुंबई फांऊडेशनचे अधिकारी,यांचे प्रामुख्याने तपशीलवार मार्गदर्शन करणार आहेत.महाराष्टातील प्रत्येक जिल्हयातील विदयार्थी,व पाच तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक यांची निवड करण्यात आली आहे.या बालपरिषदेनंतर जनजागृतीचे कार्य केले जाणार आहे.
नागरिकांचे स्वास्थ सुदृढ व निरोगी व्हावे,तो बलशाली होऊन निकोप जिवन जगून राष्टहिताच्या व राष्टविकासाच्या कार्यात सहभागी होण्याच्या दृष्टीने शिक्षकवर्ग व विदयार्थीवर्ग फारच महत्वाची भूमिका पार पाडणार आहेत,सदर राज्यस्तरिय बालपरिषदेवर निवड झालेल्या विदयार्थ्यांचे कौतुक केले असून धुळे जिल्हात सलाम मुंबई फांउडेशन व ज्ञानदीप प्रतिष्ठान बिलाडीने या परिषदेचे संचलन केले आहे.
या बालपरिषदेसाठी डॉ.सतीश पाटील, सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक जयेश माळी,ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज शिंदे, मार्गदर्शक शिक्षक नारायण भिलाणे, गोकुळ पाटील,अनिल अहिरे, आसिफ खाटीक, आर.आर.पाटील आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
Tags
news
