उमर्दा येथे पटेल परिवारातील भगिनी यांच्या हस्ते सॅनिटरी कापडी पॅडचे वाटप, महिला व युवतींना मार्गदर्शन

 



शिरपूर : तालुक्यातील उमर्दा येथे पटेल परिवारातील भगिनी यांच्या हस्ते सॅनिटरी कापडी पॅडचे वाटप करण्यात येऊन महिला व युवतींना मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

उमर्दा येथे दि. १ फेब्रुवारी रोजी महिला व युवती यांच्या उपस्थितीत शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, केतकीबेन मुकेशभाई पटेल, कृतीबेन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते गावातील महिला, युवती, विद्यार्थिनी यांना मुकेशभाई पटेल चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सॅनिटरी कापडी पॅडचे वाटप करण्यात आले.

यावेळी धुळे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सौ. मोगरा जयवांत पाडवी, बोराडी येथील जिल्हा परिषद सदस्या सौ. जताबाई रमण पावरा, उमर्दा येथील सरपंच जमुनाबाई वसावे, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, महिला ग्रामस्थ, युवती, विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोर्णिमा पाठक यांनी केले.

 कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे तसेच शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले. यावेळी सेवाभावी उद्देशाने तसेच ग्रामीण भागातील, आदिवासी दुर्गम भागातील महिला व युवतींना विविध मार्गदर्शन गेल्या १५ दिवसांपूर्वी सुद्धा कु. द्वेता भूपेशभाई पटेल यांनी कार्यक्रम घेऊन करण्यात आले होते.

सॅनिटरी कापडी पॅड वापरणे सर्व युवती व महिलांच्या दृष्टीने फारच आरामदायी व सुरक्षित असून हे कापडी पॅड धुऊन पुन्हा वापरता येतात. सहज धुऊन वापरता येणारे स्वदेशी कपड्याने बनवलेले पॅड वापरणे गरजेचे आहे. एकदा वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या पॅड पेक्षा वेळोवेळी सहज धुता येणाऱ्या पॅड चा वापर होणे आवश्यक आहे. यामुळे पैशांची बचत होईल. 

प्रचलित पॅड पेक्षा कापडी पॅड वापरल्यास स्वच्छ भारत अभियानात देखील प्रत्यक्ष सहभाग सर्वांचा होईल. कापडी पॅड सूती कापडाने बनवलेला असल्यामुळेच शरीरासाठी आरोग्यदायी असून स्वास्थ्यासाठी लाभदायी आहे. ते नियमितपणे वापरण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन याप्रमाणे यावेळी करण्यात आले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून महिला व युवतींना पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पटेल भगिनी यांनी दिले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने