शिरपूर : तालुक्यातील जोयदा ते दोंदवाडी पाडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याची अडचण लक्षात घेता जोयदा ते दोंदवाडी पाडा हे रस्ता सुधारणा काम मंजूर करण्यात आले. या रस्त्याच्या कामासाठी जिल्हा परिषद अंतर्गत निधी मधून कामाला सुरुवात करण्यात आली असून आमदार काशीराम पावरा यांनी रविवारी दि. ३१ जानेवारी २०२१ रोजी भूमिपूजन केले. जिल्हा परिषद अंतर्गत एस. एच. १ ते दोंदवाडा रस्ता ग्रामा - ८० (किमी ०/०० ते १/५००) सुधारणा या कामाला सुरुवात झाली.
यावेळी आमदार काशीराम पावरा, सांगवी गटाचे जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल, पंचायत समिती सदस्य कमलाबाई पावरा, जोयदा सरपंच गोविंदा पावरा, पंचायत समितीचे माजी सभापती गिलदार पावरा, माजी पंचायत समिती सदस्य बालकिसन पावरा, उपसरपंच रोहिदास पावरा, ग्रामपंचायत सदस्य सुकलाल पावरा, ग्रामपंचायत सदस्य नानबाटा पावरा, कल्पेशसिंह राजपूत व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news
