शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचा सन 2021-2022 या वित्तीय वर्षाचा 134.30 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर




शिरपूर : शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचा सन 2021-2022 या वित्तीय वर्षाचा 134.30 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे.

सन 2021-22 या वित्तीय वर्षाचे एकूण अंदाजपत्रक रक्कम रु. 134.30 कोटी असुन जनरल बोर्ड सभा दि. 26/02/2021 रोजी मंजूर करण्यात आला. सन 2021-22 या वित्तीय वर्षाच्या अंदाजपत्रकात महसूली उत्पन्न रु. 37.92 कोटी अपेक्षित असून रक्कम रु. 60.36 कोटी भांडवली उत्पन्न अपेक्षित आहे. इतर उत्पन्न रु. 7.41 कोटी इतके अपेक्षित आहे, यात आरंभिची शिल्लक रुपये 28.61 कोटी इतकी अपेक्षित आहे.

जमेच्या महत्वाच्या तरतुदी :-
 या उत्पन्नात घरपट्टी पासून रुपये 395.00 लक्ष, पाणीपट्टीपासून रु. 350.00 लक्ष, दुकान भाडे पासून रु. 80.00 लक्ष, बाजार रोजभाडे रु. 30.00 लक्ष, विकास करापासून रु. 60.00 लक्ष, रिक्रिएशन गार्डनपासून / ऍ़म्युझमेंट पार्क पासून उत्पन्न रु.90.00 लक्ष, दवाखान्यापासून रु. 448.00 लक्ष, नागरी सुविधा उत्पन्न रु. 40.00 लक्ष, नळ कनेक्शन फी रुपये 24.55 लक्ष अपेक्षित आहे, शासकीय अनुदान रु. 1856.00 लक्ष अपेक्षित आहे. वरील दर्शविलेल्या फी व्यक्तीरिक्त इतर फी रक्कम रु. 418.49 लक्ष अपेक्षित आहे. भांडवली अनुदान रस्ता अनुदान रु. 50.00 लक्ष, चौदावा वित्त आयोग अनुदान रु. 900.00 लक्ष, पंधरावा वित्त आयोग अनुदान रु. 1150.00 लक्ष, पर्यटन व विकास योजना अनुदान रु.200.00 लक्ष, सु.ज.यो. नगरोत्थान अभियान (जिल्हास्तर) अनुदान रु. 240.00 लक्ष, दलित वस्ती अनुदान रु. 250.00 लक्ष, रमाई आवास योजना रु. 100.00 लक्ष, आमदार व खासदार निधी रु. 200.00 लक्ष, नगर रचना अनुदान रु. 20.00 लक्ष, वैशिष्‍ठपुर्ण अनुदान रु. 200.00 लक्ष, पंतप्रधान आवास योजना रु. 150.00 लक्ष, अल्‍पसंख्‍याक अनुदान रु. 10.00, घनकचरा व्‍यवस्‍थापन अनुदान रु. 125.00 लक्ष, सुवर्ण जयंती नगरोत्‍थान अंर्तगत रस्‍ते प्रकल्‍प रु. 1800.00 लक्ष, दलित्‍तेर अनुदान रु. 21.00 लक्ष, स्‍वच्‍छ महाराष्‍ट्र योजना रु. 25.00 लक्ष, अग्निशामक अनुदान रु. 75.00 लक्ष अपेक्षीत आहे.


खर्चाच्या महत्वाच्या तरतुदी :-
सिमेंट कॅाक्रीट रोड रु. 2850.00 लक्ष, डांबरी रोड रु. 75.00 लक्ष, कच्चे रोड रु. 25.00 लक्ष, नविन दवाखाना बाधंकाम करणे रु. 125.00 लक्ष, प्राथमीक शाळांना डिजीटल करणे रु. 50.00 लक्ष, पंतप्रधान आवास योजना रु. 650.00 लक्ष, शिरपुर शहरात उर्वरीत राहीलेल्‍या ठिाकाणी भुयारी गटार बनविणे रु. 600.00 लक्ष, जमीन संपादन करणे रु. 400.00 लक्ष, शॉपींग सेंटर बाधंकाम रु. 220.00 लक्ष, जिमनॅशिअम हॉल/ओपन जिम रु. 50.00 लक्ष, पाणीपुरवठा पाईप लाईन टाकणे रु. 600.00 लक्ष, दवाखाना यंत्रसामग्री खरेदी रु. 200.00 लक्ष,  रस्‍त्‍यावरील दिवाबत्‍ती रु. 75.00 लक्ष, कंपॉऊड वॉल बाधंकाम रु. 200.00 लाख, समाज मंदीर बांधकाम व इलेक्‍ट्रीफिकेशन करणे रु. 53.00 लक्ष, ऍम्‍युझमेन्‍ट पार्क भांडवली साठी रु. 75.00 लक्ष, रमाई आवास घरकूल रु. 100.00 लक्ष, आरोग्‍य विभागासाठी व इतर कामासाठी वाहन खरेदी रु. 150.00 लक्ष, वैयक्‍तीक शौचालय बांधकाम रु. 30.00 लक्ष, नगरपरीषद कार्यालय बाधंकामा व फर्नीचर इत्‍यादी साठी रु. 30.00, लक्ष, बागेसाठी उपकरणेखरेदी करणे रु. 20.00 लक्ष, अमरधामसाठी विदयुत दाहीनी खरेदी करणे रु. 100.00 लक्ष, नगरपरीषद यत्रंणासाठी सोलर पॅनल खरेदी करणे रु. 100.00 लक्ष इ. अपेक्षित आहे.

सन 2021-22 या वर्षात एकूण खर्च रुपये 134.28 कोटी इतका अपेक्षित असून महसूली खर्च रक्कम रु. 47.11 कोटी, भांडवली खर्च रु. 69.48 कोटी व इतर खर्च रु. 17.69 कोटी धरण्यात आला आहे. यात आजअखेर शिल्लक रु. 1.96 लक्ष इतकी अपेक्षित धरण्यात आली आहे.

आमदार अमरिशभाई पटेल यांचे मागदर्शनाने व नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष विदयमान स्‍थायी समिती सदस्‍य प्रभाकरराव चव्हाण, नगरसेवक मोहन हुलेसिंग पाटील, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांनी सभेत मार्गदर्शन केले.
मुख्याधिकारी अमोल बागुल, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी सभेत अंदाजपत्रकाची विस्‍तृत माहीती सादर केली. नगर अभियंता माधवराव पाटील,  मोहन जडिये, आरती काळे, मयुर शर्मा यांनी सभेत वार्षीक अंदाजपत्रकाचे कामकाज पाहीले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने