(श्री.प्रभाकर आडगाळे)
मालपुर ता.शिंदखेडा येथील नुतन पाण्याची टाकीचे काम पुर्णत्वाकडे असतांना संतोषीमाता नगराच्या मधुन पाईप लाईनचे खोदकाम चालु असतांना माथेफिरु पणामुळे काम बंद करुन आज बुजण्यात येत आहे.चार पाच दिवसांपुर्वी ग्रामपंचायतने J.C.B मशिनच्या साहाय्याने खोदकाम सुरु होते ते आज बंद करण्यात आले.या वरुन एक अहिराणी भाषा म्हण आठवली "काम नाही काय करु फाटेल लुगड दांडे करु."या अहिराणी भाषेतील म्हणी प्रमाणे मालपुर ग्रामपंचायतीचे झाले आहे.कामाचे नियोजन नसल्यामुळेच अशा समस्या निर्माण होतात.अर्धवट काम हेच मालपुर गावाचे खास वैशिष्ट्य आहे.ग्रामपंचायतीने जे विकास कामे केलीत ते अर्धवटच आहेत.पुर्णत्वास कधी होतील हाच प्रश्न गावकर्यांना सतावत आहे.अजुन बर्याच भागात फेव्हर ब्लाॅकचे कामे अपुर्णच आहेत.ते "समस्या मालपुरच्या या भागात पाहणारच "आहेत संतोषीमाता नगरातील जेष्ठ नागरीक म्हणतात की आम्ही लोकांना पायीचालता सुध्दा येत नाही.एवढा खराब रस्ता ग्रामपंचायतीने करुन टाकला आहे.तरी पुन्हा क्राॅंकिटकरण किंवा फेव्हर ब्लाॅक करण्यात यावे.अशी तक्रार पत्रकार प्रभाकर आडगाळे यांच्या कडे मांडण्यात आली.
Tags
news

