शिरपूर : तालुक्यातील हिंगोणीपाडा ग्रामपंचायत बिनविरोध झालेली असून आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तारसिंग पावरा यांच्या पॅनलचे सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.
पावरा बिनाबाई सत्तारसिंग, पावरा संगीताबाई तिनशा, पावरा सुनीता अत्तरसिंग, पावरा सत्तारसिंग दुर्गा, पावरा सुमित्रा सुरुपसिंग, पावरा इताराम रतन, पावरा प्यारीबाई गमन्या हे बिनविरोध निवडून आले.
आमदार कार्यालय जनक व्हीला येथे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
Tags
news
