शिरपूर : तालुक्यातील असली ग्रामपंचायत बिनविरोध झालेली असून आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
रुपाली सुनील कोळी, हिराबाई भिका कोळी, राजेंद्र बाबुराव धनगर, वसंत पुना भिल, सपनाबाई पांडुरंग धनगर, नूरसिंग ओंकार पावरा, पार्वताबाई रघुनाथ वंजारी, अनिताबाई आपाराम कोळी, उखडू गुलाब कोळी, सुनील बिसन मोरे, दुर्गाबाई कैलास मोरे हे बिनविरोध निवडून आले. पॅनल बिनविरोध निवड होण्यासाठी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, युवक यांनी प्रयत्न केले तसेच राहुल ईशी, सुनील वाघ, किरण कोळी, छोटू धनगर, भूषण धनगर, भटू कोळी, अमोल कोळी, सुरेश मोरे यांनी परिश्रम घेतले.
आमदार कार्यालय जनक व्हीला येथे आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
Tags
news
