रवींद्र इंगळेंच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घ्या मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे पत्रकारांची मागणी





धुळे-सुकवद ते सतमाने फाटा राज्यमार्ग क्र.12 वरील बेकायदेशीर वृक्षतोड व विनापरवानगी वनोपज वाहतुक घोटाळ्याप्रकरणी संबंधीतांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत.मुळ तक्रारदार रविंद्र नामदेव इंगळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची मुद्देनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने अध्यक्ष सुनिल पाटील,सचिव धनंजय दिक्षीत,माजी अध्यक्ष चंद्रशेखर पाटील आदींसह  पत्रकारांकडून करण्यात आली.उपवनसंरक्षक श्री.भोसले यंाच्याकडे निवेदनाद्वारे केली.
याबाबत मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक धुळे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ठ वनोपज) नागपूर यांचे आदेश क्र.अप्रमुवसं/(अव) स्वीस/269/2020-21  दि.12/01/2021 च्या नुसार मुळ तक्रारदार रविंद्र नामदेव इंगळे यांनी आपल्या कार्यालयीन स्तरावर दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वनपाल,वनरक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई आपल्या कार्यालयीन स्तरावरुन करण्यात आली आहे.मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी व सहाय्यक वनसंरक्षक (जंकासा व कॅम्पा) आदिंवर जबाबदारी निश्चित होण्याइतपत सबळ पुरावे विभागीय वनअधिकारी, दक्षता,धुळे यांच्या चौकशीत सिध्द झाले असतांना संबंधीतांवर आजतागायत कोणत्याही स्वरुपाची कठोर कारवाई झाली नाही. वास्तविक उक्त संदर्भीय आणि विषयांकीत संबंधीतांवर कारवाई होणे अपेक्षीत असतांना झाल्याचे दिसून येत नाही. दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर तात्काळ फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे  आपल्या स्तरावरुन करण्याचे आदेश पारित व्हावेत.उक्त  संदर्भीय आणि विषयांकीत तात्काळ संबंधीतांवर कारवाई न झाल्यास धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाला मुळ तक्रारदार रविंद्र नामदेव इंगळे यांच्या भुमिकेला आणि आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवावा लागेल अशी मागणी देखील यावेळी निवेदन सादर करतांना करण्यात आली.
वृक्षतोड आणि विनापरवाना वाहतूकप्रकरणी सहा.वनसंरक्षक संजय पाटील
आरएफओ महेश पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करा ः रवींद्र इंगळे
धुळे-सुकवद ते सतमाने फाटा राज्य मार्ग क्र 12 च्या रस्ता दुतर्फा वृक्षतोडी पासून निघालेल्या व निघणार्‍या इमारती नग व जळावू लाकडास वाहतूक आदेशासाठी तयार केलेल्या खोटे कागद पत्रांची/ पंचनामे,मोजमापची चोकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून प्रचलित कायदयाप्रमाणे फोजदारी गुन्हा दाखल करणे साठी मी  दिनांक 22/10/ 2020 रोजी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक(अकाष्ठ वनोउपज) नागपूर यांना ईमेल व्दारे व वनसंरक्षक प्रादेशिक धुळे, उपवनसंरक्षक वनविभाग धुळे  यांचेंकडे पूराव्यानिशी समक्ष भेटून तक्रार दाखल केली आहे.सदर तक्रारीची दिनांक 30/10/2020 रोजी विभागीय वनअधिकारी (दक्षता) धुळे यांनी माझ्या समक्ष चोकशी केली असून सदर चोकशीत एकूण 856 झाडाची तोड झाले असल्याचे आढळून आले असून त्या पासून निघालेले वनउपोज इमारती लाकूड व ज़ळावू लाकूड जागेवर आढळून आलेले नाही सदरचे इमारती व जळावू असे एकूण 3081.306 घनमिटर म्हणजे सुमारे 300 ते 400 ट्रक वनउपज बेकायदेशिर वाहतूक झाल्याचे देखील स्पट झाले असून 291 वृक्ष प्रत्येक्षात उभी असून तोड झालेल्या वृक्षांचे व न तोडलेल्या वृक्षाचे खोटे बनावट पंचनामे,मोजमाप,व इतर कागदपत्र काल्पनिक तयार करून वाहतूकीचा परवाना मिळवण्यासाठी प्रस्ताव संबधित वनपाल,वनपरिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक यांनी दाखल केल्याचे देखील स्पष्ट झाले आहे अशी माहिती आर.टी आय कार्येकर्ते रविंद्र इंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली
या बाबतीत अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक(अकाष्ठ वनोपज) नागपूर यांनी वनसंरक्षक वनवृत्त धुळे यांना दिनांक 5/11/2020 रोजी पत्र पाठवून संबधितांना तात्काळ निलंबित करून  कायदेशिर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, सदर पत्राची प्रत पवनसंरक्षक यांना देखील दिली असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.चोकशीत माझी तक्रार तंतोतंत खरी असल्याचे निष्पन झाले असून दोन वनपाल चार वनरक्षक यांना दिनांक  19/10/20 रोजी निलंबिंत करण्यात आले आहे. मात्र वनपरिक्षेत्र अधिकारी, शिंदखेडा व सहा.वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा) यांना  संरक्षण दिले जात असल्याने  त्यांच्या वर कारवाई होवून  विना परवाना पसार करण्यात आलेले  इमारती व जळावू माल सरकार जमा करण्यासाठी मी, प्रजासत्ताक दिनी  जिल्हाधिकारी कचेरीसमोर लाक्षणिक उपोषणास बसणार आहे.असेही यावेही म्हणाले.
 धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील  सुकवद ते सतमाने फाटा राज्यमार्ग क्रमांक 12 चे रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असून सदर रस्ते कामामध्ये अडथळा ठरणार्‍या मोठ्या व जुन्या अशा एकूण 1147 वृक्षांची तोड करण्याची  परवानगी मिळणे साठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग(रो.ह.यो) धुळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी  शिंदखेडा  यांचे कडे प्रस्ताव दाखल केला होता.वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदखेडा यांनी 12/8/2020 रोजी सदर वृक्षतोडीस परवानगी दिली असून सदरची परवानगी देतांना वनखात्याच्या सर्व नियमांना बगल देऊन  परवानगी देण्यात आली आहे जसे वृक्षतोडीची परवानगी देतांना मालकी सिध्द करणेसाठी सातबार उतारा व तहसिलदार यांचे प्रमाणपत्र  सदर परवानगी अर्जा सोबत जोडणे आवश्यक असते सदर प्रस्तावा सोबत सातबार उतारा व तहसिलदार यांचे प्रमाणपत्र न तपासता घाईगर्दीने 12/8/2020 रोजी  एकूण 1147 वृक्षांना बेकायदेशिररित्या तोड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामूळे वनखात्याचे व पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले आहे.
दिनांक 30/9/2020 रोजी वनपाल शिंदखेडा व वनपाल दोंंडाईचा यांनी तोडलेल्या वृक्षांपासून निघालेल्या वनउपजाची प्रत्येक्ष जागेवर जाऊन संपूर्ण मालाचे मोजमाप घेवून मोजमाप यादी ,पंचनामा, इत्यादी कागदपत्रे तयार केल्याचे दर्शऊन  वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदखेडा यांच्याकडे अहवाल दाखल केला असता वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदखेडा यांनी सदर वनउपजास वाहतूक परवानगी मिळणेसाठी घाईगर्दीत एकाच दिवसात म्हणजे दिनांक 1/10/2020 रोजी मा.उपवनसंरक्षक वनविभाग धुळे यांचे कार्यलायात अहवाल  सादर केला आहे.सदर अहवालात नमूद केले आहे की,तोडलेल्या वृक्षांपासून वनउपजाचे एकूण इमारती नग 1935 व त्याचे घनफळ 845 व जळावू मालाचे घनफळ 2440 आहे असे एकूण वनउपजाचे घनफळ 3285 आहे.
  सदरच्या प्रस्तावाची प्रत्येक्ष जागेवर जाऊन खात्री करून अहवाल सादर करण्याचे आदेश उपवनसंरक्षक धुळे यांनी  सहा.वनसंरक्षक(जंकास व कम्पा)या आदेश दिले होते त्यानूसार सहा वनसंरक्षक यांनी 20/10/20 रोजी सदर रस्त्याची पाहणी संबधीत वनपरिक्षेत्र अधिकारी,वनपाल, वनरक्षक  यांच्या सह केली असता. वनक्षेत्रपाल यांनी अहवालात नमूद केल्या प्रमाणे तोड केलेल्या वृक्षापासून निघालेले इमारती नग, जळावू लाकडाची थप्पी जागेवर आढळून आलेली नाही जे झाडे तोडण्यात आलेल्याचे  दर्शविण्यात आले आहेत.ती त्यांना उभे असल्याचे दिसून आले सदरचा अहवाल  बनावट व काल्पनिक स्वरूपाचा असल्याचे सहा.वनसंरक्षक(जंकास व कम्पा) यांच्या तात्काळ लक्षात आले होते  त्यांनी  तात्काळ आपला अहवाल  वरिष्ठांना सादर करून संबधीत वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल,वनरक्षक यांच्यावर कारवाई करणे बाबत पाउल उचलणे आवश्यक होते पंरतु त्यांनी तसे न करता सदरची बाब वरिष्ठापासून लपवून ठेवण्यात आली होती.  माझी तक्रार दिनांक 22/10/20 रोजी दाखल झाल्यानंतर व वरिष्ठ कार्यालाया कडून चोकशी करणे बाबतचे पत्र आले नंतर पश्चात बुध्दीने आपला अहवाल  उपवनसंरक्षक धुळे यांना दिनांक 27/10/20 रोजी सादर केला असून त्यांनी आपल्या अहवालात.197 झाडे उभे असल्याचे दर्शविले असून मात्र मी  विभागीय वनअधिकारी (दक्षता) यांचे सोबत चोकशी साठी गेलो असता मला 291 झोडे उभे असल्याचे आढळून आले मी सहा.वनसंरक्षक  यांचे पेक्षा 100 झाडे जास्तीची शोधून काढली आहेत. (सदर झाडांचे तोड झाल्याचे खोटे पंचनामे व मोजमाप सादर झाले आहेत) चोकशी अधिकारी यांनी देखील आपल्या अहवालात 291 झाडांची नोंद घेतली आहे. यावरून ऐव्हडे गंभीर प्रकरण असतांना सहा.वनसंरक्षक यांनी ते दडविण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. त्यांचा देखील सदर घोटाळ्यात सहभाग असल्याचे दिसून आल्या शिवाय राहत नाही. मी तक्रार दाखल केल्यामूळेच त्यांनाी घाईगर्दीने पश्चात बुध्दीने  आपला अहवाल देवून  आपला बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. जर मी या बाबतीत तक्रार दाखल करून पाठपूरावा केला नसतातर सदरचे प्रकरण पध्दतीशी पणे दडपण्यात आले असते असे माझे ठाम मत आहे.असेही ते यावेळी म्हणाले.तसेच वनविगातील वृक्षतोड आणि विनापरवानगी वाहतुक प्रकरणी वनपाल,वनरक्षक यांना निलंबित करण्यात आले.मात्र कटाचे सुत्रधार सहाय्यक वनरक्षक (जंकासा व कॅम्पा)संजय पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील हे असुन त्यांच्यावर देखील जबाबदारी निश्चित करण्यात येवून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
वनविभागातील उक्त प्रकरणी गेल्या 3 महिन्यापासून वरिष्ठ स्तरावर देखील वेळोवेळी पाठपुरावा करीत असून याबाबत ठोस कारवाई होणे अपेक्षीत असतांना ती झाली नाही,पत्रकार संघाने सदर प्रकरणी पुढाकार घेवून वनखात्यातील बोकाळलेला बेबंदशाही कारभार चव्हाट्यावर आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने