शिरपूर : धुळे जिल्ह्यातील १७ वर्षे आतील क्रिकेट खेळाडूंसाठी श्री विले पार्ले केलवणी मंडळ च्या वतीने शिरपूर शहरात एस.व्ही.के.एम. टी-२० चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे दि. २४ जानेवारी २०२१ ते दि. २८ जानेवारी २०२१ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.
संस्थे मार्फत स्पर्धेपूर्वी धुळे, साक्री, शिंदखेडा व शिरपूर येथे निवड चाचणी शिबिरे घेण्यात आली. सर्व शिबिरांना खेळाडूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला. निवड झालेल्या खेळाडूंचे तज्ञामार्फत आठ दर्जेदार संघ तयार करण्यात आले आहेत. त्यात एस.व्ही.के.एम. रॉयल्स शिरपूर, एस.व्ही.के.एम. चॅलेंजर्स शिरपूर हेे दोन संघ शिरपूरचे आहेत. तसेच धुळे येथील पाच संघ आहेत यात मुकुंद ज्वेलर्स धुळे, कृष्णाई होटेल धुळे, स्वप्नपूर्ती साई इलेव्हन धुळे, यज्ञ अबॅकस क्लासेस धुळे, सारथी फायटर्स धुळे यासह हस्ती स्कूल दोंडाईचा असे
एकूण आठ संघ आहेत.
सदर संघांमध्ये मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूल मैदान तांडे ता. शिरपूर व आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज मैदान शिरपूर येथील हिरवेगार मैदानांवर साखळी पद्धतीने सामने खेळविण्यात येणार आहेत. एस.व्ही.के.एम. संस्थेच्या वतीने सर्व खेळाडूंना गणवेश, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, प्रवास सेवा हे मोफत करण्यात आले आहे. उर्वरित वेळेत खेळाडूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट, योगवर्ग, संगीत, भटकंती आदी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेत खेळाडूंना रोख पारितोषिके, चषके, प्रमाणपत्रे या स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. एकंदरीत युवा क्रिकेट खेळाडूंसाठी सदर क्रिकेट स्पर्धा ही एक मेजवानी ठरणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाची अनुभूती खेळाडू यांना स्पर्धा कालावधीत अनुभवता येणार आहे.
संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, संस्था सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात एस. व्ही. के. एम. संस्थे तर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नियमितपणे प्रयत्नशील आहे. धुळे जिल्ह्यातील खेळाडू राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात भरारी घ्यावी व त्यांनी क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करावे यासाठी पटेल परिवाराच्या वतीने नियमितपणे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शिरपूर शहरात संस्थेच्या वतीने उदयोन्मुख खेळाडूंसाठी गेल्या वीस वर्षांपासून अनेक स्पर्धा भरविण्यात आल्या असून अनेक खेळाडू यांनी क्रिकेट जगतात आपली चुणूक दाखविली आहे.
स्पर्धा यशस्वीतेसाठी धुळे जिल्ह्याच्या वतीने सारथी क्रीडा अकॅडमीचे विजय पंजाबी, स्वप्नील निकुंभ तसेच शिरपूर येथे क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल व एस.व्ही.के.एम. संस्थेचे शिरपूर कॅम्पस मुख्य लेखापाल व प्रशाआक राहुल दंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचेे सर्व क्रिकेेट प्रशिक्षक परिश्रम घेत आहेत.
Tags
news
