एसपीडीएम महाविद्यालयात स्व. प्राचार्य विजयराव रंधे जयंतीनिमित्त राष्ट्रीय ई परिषद संपन्न




शिरपुर येथील किविप्र संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयात संस्थेचे तत्कालीन कोषाध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य स्व. डॉ. विजयराव रंधे यांच्या 68 व्या जयंतीनिमित्त आयक्यूएसी व वाणिज्य विभागातर्फे एकदिवशीय राष्ट्रीय ई परिषद संपन्न झाली. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष व जिल्हा परिषद धुळे चे अध्यक्ष माननीय नामदार डॉ. तुषार रंधे हे होते. उच्च शिक्षण सहसंचालक जळगाव विभाग डॉ. सतीश देशपांडे यांनी उद्घाटन केले. संस्थेच्या कोषाध्यक्षा माननीय आशाताई रंधे व विश्वस्त मा . रोहित रंधे प्रमुख अतिथी म्हणून सर्वांची ऑनलाइन उपस्थिती होती. याप्रसंगी प्रा. डॉ.मधुकर गीट्टे मुंबई व डॉ. जगबीर सिंग कद्यान दिल्ली यांनी बीज भाषण केले.

भारतभरातून आलेल्या अभ्यासकांनी एकूण चार सत्रात आपापले शोधनिबंध सादर केले. या सत्राच्या अध्यक्षपदी डॉ.अनिल सरोदे, डॉ.शुभदा कुलकर्णी जळगाव,  डॉ.एन.बी. गोसावी नंदुरबार तसेच गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. चंदन बोरा हे होते. 

या राष्ट्रीय चर्चासत्रात 125 अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर केले. परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.एन.पटेल यांनी केले. आयक्यूएसीचे समन्वयक डॉ. दिनेश भक्कड यांनी या परिषदेचे संयोजन केले. उपप्राचार्य प्रा. दिनेश पाटील डॉ.एम व्ही पाटील, प्र. कार्यालय अधीक्षक संजय निकम यांचेसह महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी यांची उपस्थिती लाभली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन डॉ.दिनेश भक्कड यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने