ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर चर्चा
धुळे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव साहेब ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांचेशी व्हिडीओ कॉन्सफरसिंगद्वारे संवाद साधला. जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिवसेनेच्या ग्रामपंचायती निवडून आणण्यासाठी योग्य नियोजन करु, असे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी बोलतांना सांगितले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव साहेब ठाकरे यांनी बुधवार दि. 6 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.30 वाजता व्हिडीओ कॉन्स्फसिंगद्वारे जिल्हाप्रमुखांशी संवाद साधून श्री.हेमंत साळुंके यांचेकडून निवडणूकी संदर्भात जिल्ह्याची सर्व पार्श्वभूमी समजून घेतली. माहिती देतांना श्री.साळुंके म्हणाले की, शिंदखेडा तालुक्यात महाळपूर, दिवी व वडदे अशा तीन व शिरपूर तालुक्यातील हिंगोणीपाडा अशा एकूण चार ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या जागा बिनविरोधी झाल्या. त्यात सुध्दा शिवसेनेचे सदस्य निवडणून आलेली आहेत. अनेक गावांमध्ये शिवसेनेचे पॅनल उभे असून तेथूनही शिवसेना निवडणून येईल असा विश्वास श्री.साळुंके यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेच्या निवडून आणण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्यासह सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, तालुका संघटक डॉ.मनोज पाटील उपस्थित होते.
