मतिमंद बाबा उर्फ (अकबर अली) अखेर जन्मदात्या कडे 5 वर्षां नंतर सुपूर्द........



आधार कार्ड च्या माध्यमातून पालकांच्या ताब्यात विद्यार्थी-- संस्थेचे मोठे यश ...  
 
१४ वा विद्यार्थ्याचे सर्वात मोठे पुनर्वस....... 

     शिरपूर -  संस्थेतील दाखल प्रवेशित बाबा उर्फ (अकबर अली) रा.संत कबीर नगर. रायत.जि.बस्ती उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला बाबा घरी परतला. संस्थेने आता पर्यतं १३ मुलांचे पालक आधार कार्डच्या माध्यमातून शोधून काढले आहेत. हे सर्वात मोठे पुनर्वसन झाले असल्याची माहिती संस्थेने  दिली आहे.
                                 संस्थेत दाखल बाबा उर्फ (अकबर अली) यास अखेर संस्था व बाल कल्याण समिती धुळे यांच्या उपस्थितीत त्याच्या वडीलांकडे सुपूर्द करण्यात आले.त्याचा खडतर प्रवास पुढीलप्रमाणे- 
   सन २०१५ मध्ये वडीलांसोबत पाणी भरण्यासाठी घराबाहेर निघालेला बाबा घरी पोहचला नसल्याने वडीलांनी त्यांच्या घराचा आसपास चा परिसरात शोध घेतला असता तो कोठेही आढळून आला नाही.त्या वेळी त्याच्या वडीलांनी खुप शोधाशोध केली पण बाबा काही सापडेना...   त्या नंतर दि.०९/११/२०२० रोजी बाल कल्याण समिती वाशीम यांच्या पुनर्वसन व बाल कल्याण समिती धुळे यांच्या आदेशाने बाबा उर्फ (अकबर अली) हा शिरपूर स्थित कै.बापूसाहेब एन झेड मराठे  विधायक संस्था थाळनेर संचलित "अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह " शिरपूर येथे प्रवेशित झाला.त्या नंतर काही दिवसांनी क्रांइम ब्राच शाखा ठाणे.जि.ठाणे. यांच्या मार्फत आँपरेशन मुस्कान मोहिम सुरू करण्यात आली.त्या मोहीमे अंतर्गत काही मुलांचे फोटो संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. भगवानजी तलवारे यांना सोशल मिडीया द्वारा पाठविले असता या बालकाचा चेहरा आमच्या बालगृहातील प्रवेशित बाबा याच्याशी मिळता जुळता असल्याने मा.श्री.भगवानजी तलवारे साहेब यांनी क्रांइम ब्रांच ठाणे यांना कळविले असता त्याच्या सर्व कागदपत्राची जुळवा जुळव करून बाबा याचे खरे नांव " अकबर अली " रा. संत कबिर नगर. रायत जि बस्ती (उत्तर प्रदेश ) येथील रहिवासी असल्याचे सिद्ध झाले. संस्थे मार्फत बाल कल्याण समिती धुळे यांच्याशी संपर्क साधून दि.०६/०१/२०२१ रोजी त्यास त्याच्या वडीलांना बाल कल्याण समिती धुळे यांच्या आदेशाने सुपूर्द करण्यात आले.त्या वेळेस संस्थापक अध्यक्ष श्री.भगवानजी तलवारे, संस्था प्रतिनिधी भुषण मराठे, बाल कल्याण समिती अध्यक्ष मा.श्री.अमित दुसाणे साहेब,सदस्या सौ. वैशाली पाटील मँडम, सौ. चौधरी मँडम, बालगृहाचे प्र.मुख्याध्यापक श्री.गणेश निकुम, प्र अधिक्षक श्री.योगेश दाभाडे, लिपीक विवेक वाघ,काळजी वाहक सुनिल पाटील हे उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने