शिरपूर : शहरातील जैन गल्लीतील जैन उपाश्रामध्ये धर्मचक्र तीर्थाचे शिल्पकार आचार्य भगवंत श्रीजी दर्शन वल्लभ सुरीश्वरजी म.सा. , अर्हमवल्लभ सुरीश्वरजी म.सा., मुनीश्री नम्रमुनीवल्लभ सुरीश्वरजी म.सा. आदी ठाणा
३ यांचे दोन दिवसापूर्वीच सुवर्ण नगरीत आगमन झाले यांच्या समवेत येथील मुर्तीपुजक श्री संघाने मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांना सन्मान पत्रक , शाल देऊन गौरविण्यात आले यावेळी आचार्य भगवंत श्रीजी दर्शनवल्लभ सुरीश्वरजी महाराज यांनी प्रवचनातून संसार आणि संयम या विषयावर उपस्थित भाविकांना मार्गदर्शन दिले याप्रसंगी जालण्याचे संगीतकार मेहूल जैन व शिरपूर चे रोनक कोचर यांनी धार्मिक जैन स्तवन म्हणत भाविकांना तल्लीन केले तद्नंतर मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांनी मनोगत व्यक्त केले तसेच पार्श्वनाथ भगवान यांच्या जन्मकल्याणक महोत्सव दिना निमित्ताने काव्य हितेश जैन या ९ वर्षाच्या बालकाने निरंकट ३ उपवास केल्या चे कौतुक समाजबांधवांनी केले अजून अन्य भाविकांची तपस्या असल्याचे समाजबांधवांनी सांगितले
यावेळी जैन समाजाचे उपाध्यक्ष नितीन जैन , हसमुखलाल जैन , जतीन जैन , किर्ती जैन , हितेश जैन , प्रसन्न जैन , आनिल जैन तसेच वीर पिता गौतम चोरडिया , वीर माता मिना चोरडिया यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
Tags
news
