■■ तळोद्याला 30 ऑक्सिजन खाटाची व्यवस्था करा- डॉ.भारुड




नंदुरबार  : कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे 30 ऑक्सिजन खाटाची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. 

डॉ.भारुड यांनी आज तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालय व स्वॅब संकलन केंद्राला भेट दिली यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, तहसिलदार गिरीष वखारे, मुख्याधिकारी सपना वसावे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण आदि होते.

डॉ.भारुड म्हणाले, उपजिल्हा रुग्णालय येथे 30 ऑक्सिजन बेड क्षमतेसह कोविड रुग्णालय लवकर सुरु करावे. रुग्णालय लवकर सुरु करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय साधावा.  रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी.  मिनी ऑक्सिजन प्लॅन्ट  सुरु करण्यासाठी  आवश्यक व्यवस्था करावी. रुग्णालयातील परिसरात नियमित स्वच्छता ठेवावी.
 जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया कक्षाला भेट दिली. तसेच नवीन तालुका वैद्यकीय कार्यालयासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने