जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली चिमठावळ येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश



येणाऱ्या काही दिवसात अनेक मातब्बरांचा शिवसेनेत पक्षप्रवेश : हेमंत साळुंके

*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : तालुक्यातील चिमठावळ येथील भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात युवासेनेचे गणेश परदेशी यांनी प्रमुख भुमिका निभावली.
       सविस्तर वृत्तानुसार, शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील भारतीय जनता पक्षाचे अनेक कार्यकर्ते हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना लवकरच नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. तसेच येणाऱ्या काही दिवसात शिंदखेड्यातील अनेक मातब्बरांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होईल, असे श्री.साळुंके यांनी सांगितले.
       शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये राजेंद्र मेताराम मराठे, खुशाल मन्साराम पाटील, प्रकाश लुका मराठे, नितीन शांताराम पाटील, मनोहर भिका पाटील, कल्पेश लालचंद पाटील, कैलास माणिक वडार, बारकु सोनु भिल, विनोद युवराज पाटील, बापु गोरख कांबळे, सुनिल दिलीप पाटील, शरद नानाभाऊ पाटील, विठ्ठल पाटील, शांतीलाल पाटील, इंदास मराठे, राकेश पाटील, हितेंद्र निकम यांचा समावेश आहे. हा पक्षप्रवेश घडवून आणण्यात युवासेनेचे गणेश परदेशी यांनी प्रमुख भुमिका निभावली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका प्रमुख गिरीश देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, उपतालुका प्रमुख संतोष देसले, प्रदीप दिक्षीत सर, युवासेनेचे गणेश परदेशी, प्रदीप पवार, प्रशांत जगताप, भगवान कुमावत, नाना पहाडी, संदीप राजपुत, दिपकराव जगताप, सुकदेव बागुल आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने