विखरण येथील श्री विलास शांताराम पाटील यांचे सुपुत्र सुमित विलास पाटील वय 13 वर्षे यांस गेल्या तीन वर्षापासून किडनीचा आजार असल्याने दवाखान्यात वेळोवेळी जाऊन कोणत्याही प्रकारचे निदान मिळत नव्हते त्यामुळे श्री विलास पाटील हे परेशान होते त्यासंधर्भात विखरण गावातील युवा कार्यकर्ते श्री दशरथ पाटील यांनी माननीय भूपेशभाई यांच्याजवळ सदर व्यथा मांडली त्यावर त्यांनी त्या मुलाच्या वैद्यकीय सुविधेसाठी नाशिक येथील नामांकित दवाखान्यात पुण्याच्या डॉक्टरांमार्फत शस्त्रक्रिया करून मोफत उपचार करून दिले सदरहू विलास पाटील हे सर्वसाधारण कुटुंबातील अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत मोलमजुरी करून जीवन जगत असताना मुलावर आलेल्या आजाराचे संकट त्यांच्यासाठी खूप धोक्याचे होते आणि त्यासाठी त्यांना येणारा खर्च हा परवडणारा नव्हता त्याचक्षणी गावातील दशरथ पाटील यांनी भूपेशभाई यांच्या मार्फत त्यांचे ऋग्नमित्र दिलीप माळी यांच्याकडून सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून तसेच संबंधित दवाखान्यातील डॉक्टरांशी चर्चा करून चिरंजीव सुमित त्याचे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडले या कामासाठी विखरण गावावर अतोनात प्रेम मा. भुपेशभाई यांचे असल्याचे चित्र या कार्यावरून दिसून आले त्यानिमित्ताने त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी गावातील युवा कार्यकर्ते युवा नेतृत्व श्री दशरथ पाटील श्री तुषार पाटील पोलीस पाटील श्री केतन पाटील श्री काशिनाथ पाटील श्री प्रशांत पाटील श्री योगेश धनगर, श्री नागराज पाटील शुभम पाटील तसेच विखरण येथील सर्व नागरिकांनी भूपेशभाईंचे व त्यांचे आरोग्य मित्र श्री दिलीप माळी व अशोक बापू सुनील जैन यांचे या कामाबाबत आभार व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
news
